आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या, सासू आणि साडूही करत होते छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाणा/बिबी- पिंप्री खंदारे येथे नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून एका तीस वर्षीय विवाहित युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. सूरज नामदेव सानप असे मृत युवकाचे नाव आहे. प्रकरणी मृतकाच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी पत्नी, सासू व साडूविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. 


सूरज हा बऱ्याच दिवसांपासून दरेगाव येथे वास्तव्याला होता. घटनेच्या दिवशीच तो पिंप्री येथील नातेवाइकांकडे भेटीसाठी आला होता. दुपारी साडेपाचच्या सुमारास त्याने बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रभाकर चौधरी यांनी दिली. माहिती मिळताच पोहेकाॅ सलिम देशमुख, पंडित नागरे व विनोद गवई यांनी पंचनामा केला. या वेळी मृतकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये पत्नी, सासू व साडूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचेे नमूद केले होते. नारायण सानप यांच्या तक्रारीवरून मृतकाची पत्नी द्रौपदा सानप, सासू कांताबाई अर्जुन कायंदे व साडू गबाजी आश्रृजी घुगे रा. येवती यांना अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय बी. बी. माळी हे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...