Home | Maharashtra | Vidarva | Akola | accident of cruiser car in hiwarkhed

दोन झाडांमुळे टळली अांबेनळी घाटातील घटनेची पुनरावृत्ती

प्रतिनिधी | Update - Jul 31, 2018, 12:37 PM IST

सहलीकरिता हिवरखेड येथील तीन कुटुंब क्रुझर क्रमांक एमएच २७, एसी १२१५ या गाडीने चिखलदऱ्याला जात असताना २९ जुलै रोजी सकाळी

  • accident of cruiser car in hiwarkhed

    हिवरखेड- सहलीकरिता हिवरखेड येथील तीन कुटुंब क्रुझर क्रमांक एमएच २७, एसी १२१५ या गाडीने चिखलदऱ्याला जात असताना २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सातपुड्याच्या घाटात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.


    गाडीचे एक्सल तुटल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन खाली खाली फरफटत गेली. धडक इतकी जबर होती की, त्यामध्ये एक ३० ते ३५ फुटाचे झाड पूर्णतः उद्ध्वस्त झाले. दुसऱ्या झाडाला जाऊन गाडी अडकली. जर त्या ठिकाणी ही दोन्ही झाडे नसती तर आज महाबळेश्वरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती, असे प्रवाशी प्रशांत मोगरे यांनी आपबीती कथन करताना सांगितले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी सात प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांना जास्त मार लागला आहे.


    या घटनेत एकूण सात प्रवासी जखमी झाले. त्यांची नावे गोविंदराव मोगरे, कुसुमबाई मोगरे, वैशाली धरमकर, प्रतीक्षा धरमकर, मंगला प्रशांत मोगरे, पियुष कामेश राठोड, रवींद्र मनोहर कराळे अशी आहेत. जवळपास कोणतेही गाव नसल्याने डाट जंगलात भयावह वातावरणात मदतीसाठी वाट बघत असताना त्यातीलच कामेश राठौड आणि मुन्ना दांडगे या युवकांनी हिम्मत करून जवळपास ७ किलोमीटर पायी जात आदिवासी ग्राम गाठले आणि तेथील काही युवकांना ट्रॅक्टर घेऊन मदतीसाठी आणले. तेथून हिवरखेड येथील गजानन भटकर व पुरुषोत्तम रेखाते यांना दुसरी गाडी घेऊन घटनास्थळावर बोलवले. घटनास्थळ एकांतात असल्याने सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागल्याने जखमींना उपचारास अकोट येथे नेण्यास बराच वेळ लागला.

Trending