आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध हातभट्टीची दारू गाळणाऱ्याविरुद्ध कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर - माना पोलिसांनी अवैध दारू भट्टीवर छापा टाकून हजारो रुपयांंचा माल जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक अकोला व उप विभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करून १२ जानेवारी रोजी पहाटेपासून कारवाई सुरू केली. अकोली जहाॅगीर येथे आरोपी दत्तु शंकर नोहरे याच्याकडून दारूच्या साहित्यासह एकूण २८,६५० रुपयांचा माल जप्त केला. मनोहरेकडून १५ लीटर दारू किंमत १५०० रुपये जप्त केली. राजकुमार अवधू्त भगतकडून १८ लिटर १८०० रुपये किंमतीची दारू जप्त केली. अवधू्त विश्वनाथ भगतकडून दारू साहित्यासह १६,०५० रुपयांचा माल जप्त केले. चार कारवायांमध्ये एकूण ४८ हजारांचा माल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार बी. पी. घुगे, पोउनि श्रीकृष्ण पाटील, नापोकाॅ नंदकिशोर टिकार, पोकॉ संदीप पवार, विनोद तायडे, सचिन दुबे, मपोकाॅ वनिता चव्हाण, डाॅ. प्रवीण ठाकरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...