आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता अंशुमन विचारे बालकलाकारांना देणार अॅक्टिंग करण्याचे धडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पाच ते १६ वयोगटातील मुलांसासाठी सुरु करण्यात आलेल्या अंशुमन विचारे अॅक्टिंग क्लासला अंशुमन विचारे १६ जून रोजी भेट देणार आहेत. ते यावेळी बाल कलाकारांशी संवाद साधणार असून त्यांना अॅक्टींगचे धडेही देणार आहेत. 


उमाकांत यादव व सपना यादव यांनी मुलांमध्ये अभिनय, वक्तृत्व, स्मरणशक्ती, सभाधीटपणा व कॅमेरासोबत त्यांचे मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने त्यांनी अंशुमन विचारे अॅक्टींग स्कूल सुरु केले आहे. या स्कूलच्या शाखा यवतमाळ व अकोला येथे आहे. 


१६ जून रोजी अंशुमन विचारे यवतमाळातील उत्सव मंगल कार्यालयात व अकोला येथील मुख्य कार्यालयालयात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यात अंशुमन विचारे अॅक्टींग क्लासेसच्या पाच शॉर्टफिल्मचे प्रदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, अॅक्टींग क्लासचे संस्थापक दीपाली सोसे, जोगेश्वर शिक्षण संस्थेचे गजानन मानकर व किसनराव हुंडीवाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर अकोल्यातील मलकापूरातील अंबिका नगरातील मुख्य कार्यालयाला अभिनेता अंशुमन विचारे भेट देणार आहेत. येथे ते बालकलाकारांशी संवाद साधणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...