आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात कंटेनरने मोटारसायकलला नेले फरफटत, एकाचा मृत्य तर एक जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अमरावती अकोला रोडवर शिवणी गावाजवळ ट्रेलर आणि मोटारसायकलच्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी 12. 30 वाजता घडला. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून ड्रायव्हर फरार झाला आहे. याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील सतीश जगदेवराव वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत सोबत मोटारसायकलवर अकोला शहराकडे येत होते. त्यावेळी अमरावती कडून येणाऱ्या कंटेनरआणि वानखडे यांच्या मोटर सायकल मध्ये भीषण अपघात झाला. मोटारसायकल चालवत असलेले सतीश जगदेवराव वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मित्र जखमी झाला आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार किशोर शेळके घटनास्थळी पोहचले व वाहतूक सुरळीत केली.  

बातम्या आणखी आहेत...