आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात तालुका, शहर स्तरावरील नियुक्त्यांमध्ये सुंदोपसुंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये ग्रामीण निवडीचा पोळा फुटला आहे. विविध कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. त्याचा आनंदही संबंधित कार्यकर्ते लुटत आहेत, जाहिरातीही दिल्या जात आहे. मात्र निवड झालेल्या यादीला अंतिम मंजुरीच मिळालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी जिल्हा ग्रामीण निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप चव्हाण यांनी दिली. यामुळे राष्ट्रवादी ग्रामीणमध्ये निवडीवरून सुंदोपसुंदी सुरु आहे.

 

राष्ट्रवादी कॉग्रेस अकोला ग्रामीण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिंगोली नगर पालिकेचे नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत तालुका आणि शहर पातळीवर कार्यकारिणी गठीत करण्यात आली. ही निवड झालेली कार्यकारिणी वरिष्ठांकडे पाठवली असून त्यांच्या निर्णया नंतरच या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने देण्यात आली होती. मात्र निवड झालेल्यांपैकी काही कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज, फलक लावून जाहिरातबाजी करुन आपली निवड झाल्याचे जाहीर केले आहे.


या प्रकाराबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परिणामी हा प्रकार निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप चव्हाण यांच्या पर्यंत पोहोचला. अद्याप कोणत्या नियुक्त्या जाहीर केल्या नसताना वरिष्ठ पातळीवर या नियुक्त्यांना मान्यता घेतलेली नसताना निवड झाल्याच्या जाहिराती कशा काय? असा प्रश्नही दिलीप चव्हाण यांच्या समोर निर्माण झाला. यामुळे दिलीप चव्हाण यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले. अद्याप कोणत्याच नियुक्त्या झालेल्या नाहीत. ज्या तालुका व शहर अध्यक्षाची नावे आलेली आहेत, ती नावे पक्षाचे राज्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश,जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार आहे. तूर्तास तालुका, शहर, जिल्ह्याची प्रस्तावित कार्यकारिणी निवडीचे काम सुरु आहे, असे दिलीप चव्हाण यांनी पत्रकात नमूद केले आहे.

 

अनेकांची झाली कोंडी
दिलीप चव्हाण यांच्या पत्रामुळे प्रस्तावित निवडीत नावे असलेल्या तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेही अडचणीत आले आहे. त्यामुळेच निवड जाहीर झालेली नसताना हा प्रकार कसा व का? घडला याचा शोध आता नेते मंडळी करीत आहेत.

 

कोणत्याही निवडी झालेल्या नाहीत
आता पर्यंत कोणत्याही अकोला ग्रामीणच्या तालुका, शहर व जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी झालेल्या नाहीत. प्रस्तावित कार्यकारिणी तयार करण्याचे काम सुरु आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल.

- दिलीप चव्हाण,अकोला ग्रामीण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

 

बातम्या आणखी आहेत...