आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा, माजी आमदार खतीब फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - देशात राष्ट्रीयीकृत बँकांमधील काेट्यवधी रुपयांचा घोटाळा गाजत असतानाच बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून,गुन्हे दाखल होताच पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. सैय्यद नातिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक फरार झाले आहेत.तर बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेची चौकशी करून बँकेचे सर्व दस्तावेज ताब्यात घेऊन बँकेला कुलूप ठोकल्याने पै पै गुंतवलेल्या ७०० ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे. देशभर गाजत असलेल्या बँकींग क्षेत्रातील घोटाळ्याचे लोण बाळापूरपर्यंत पोहोचल्याने गुंतवणूकदारांचा बँकांवरील विश्वासच उडत चालला आहे.

 

बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत सातशे ठेवीदारांनी गुंतवणूक केली आहे. माजी आमदार खतीब हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. ठेवीदारांनी आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडून ठेवी ठेवल्या होत्या. गुंतवणुकदारांच्या ठेवींचा वापर अध्यक्षांसह संचालकांनी दुसऱ्याच्या नावाने परस्पर कर्ज दाखवून दुरुपयोग केल्याचा आरोप तक्रारदार रामदास श्रीराम पराते यांनी केला आहे.दरम्यान, याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी बाळापूर पोलिसांनी अध्यक्ष,संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

 

रामदास पराते यांच्या लाखो रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. ठेवीदारांच्या ठेवींवर पतसंस्थेने कोणतेही व्याज दिले नाही तसेच बचत खात्यातही व्याजाची रक्कम जमा केली नाही. मात्र व्याज दिल्याच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ठेवीदार पैसे व्याजासह परत मागण्यासाठी गेले असता त्यांना पतसंस्थेत पैसे नाही , कर्ज वसुलीनंतर देऊ असे खोटे आश्वासन पतसंस्थेकडून मिळाले. गुंतवणूकदारांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या मुदत ठेवीच्या प्रमाणपत्रावर वेळोवेळी मुदत वाढवून देण्यात आली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पराते यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. सै. नातिकोद्दीन सै. हुसामोमद्दीन खतीब, शाम सखाराम शेगोकार, रजीया बेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमिद्दोनी सै. जमीदोद्दीन, नंदकिशोर दामोधर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफीद्दीन , गफारली रेहमानजी रंगारी, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, निर्मलाताई श्रीकृष्ण उमाळे, शे. महेमूद शे. हसन, शे. मुनीर शेख व शेख वजीर, शेख इब्राहीम या पदाधिकारी व संचालकांवर कलम ४०६, ४०९, ४१८,४६७,४६८,४७१,५०४,१२० ब, आयपीसी सह कलम ३,४ एमपीआयडी अॅक्ट १९९९ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. मोठा आर्थिक घोटाळा असल्याने हे प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.


तक्रारदार परातेंना शिवीगाळ करून हाकलून दिले
तक्रारदार पराते हे फेब्रुवारीचे पहिल्या आठवडयात पतसंस्थेचे अध्यक्ष खतीब यांच्याकडे गेले. त्यांनी ठेवीच्या पैशांची मागणी केली असता त्यांना शिवीगाळ करून हाकलुन देण्यात आले. तसेच दोन्ही डोळ्यांनी आंधळी असलेली त्यांची बहीण लीलाबाई श्रीराम पराते यांनी ३२ हजार ५०० रुपये मुदत ठेवी म्हणून ठेवले होते. पतसंस्थेने त्यांचेही पैसे मुदत संपल्यानंतर परत न करता ठेवीच्या पावतीवर तिची पूर्वसंमती न घेता मुदत वाढवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

तक्रारदार परातेंना शिवीगाळ करून हाकलून दिले
तक्रारदार पराते हे फेब्रुवारीचे पहिल्या आठवडयात पतसंस्थेचे अध्यक्ष खतीब यांच्याकडे गेले. त्यांनी ठेवीच्या पैशांची मागणी केली असता त्यांना शिवीगाळ करून हाकलुन देण्यात आले. तसेच दोन्ही डोळ्यांनी आंधळी असलेली त्यांची बहीण लीलाबाई श्रीराम पराते यांनी ३२ हजार ५०० रुपये मुदत ठेवी म्हणून ठेवले होते. पतसंस्थेने त्यांचेही पैसे मुदत संपल्यानंतर परत न करता ठेवीच्या पावतीवर तिची पूर्वसंमती न घेता मुदत वाढवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

६ कोटींच्यावर ठेवी
बुधवारी पतसंस्थेची झाडाझडती घेतली. महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. सहा कोटींच्यावर ठेवी असल्याचे समोर आले आहे. फरार अध्यक्ष व संचालकांचा शोध घेण्यात येत असून,त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
- गणेश अणे, पीआय, आर्थिक गुन्हे शाखा.

 

आकर्षक व्याजदराचे दिले होते आमिष
३० दिवस ते ९० दिवस ठेवी ठेवल्यास ११टक्के, ९१ दिवस ते १२ महिने ठेवी ठेवल्यास १२ टक्के व १३ महिण्याकरिता ठेवी ठेवल्यास १३ टक्के व्याजदर मिळेल व ७८ महिने ठेवी (धनवर्षा मुदती ठेव ) ठेवल्यास दाम दुप्पट रक्कम होईल. असे आमिष पतसंस्थेकडून देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...