आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त रकमेसह महसूल वसुलीत अकोला प्रथम; उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे कौतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गौण खनिजसह इतर महसूल वसुलीत यावर्षी अकोला तालुक्याने उच्चांक गाठला असून एकूण वसुलीच्या एक-तृतीयांश रक्कम एकट्या याच तालुक्याने प्राप्त केली आहे. जिल्ह्याची एकूण महसूल वसुली ६४ कोटी २४ लाख ३७ हजार आहे. यापैकी एकट्या अकोला तालुक्याची वसुली २२ कोटी ७८ लाख ९८ हजार आहे. 


जिल्ह्यातील सातही तालुक्यातील गौण खनिजाची रॉयल्टी आणि जमिनीचे कर अशाप्रकारे जमा झालेल्या महसूलाचा एकत्रित आकडा प्रशासनातर्फे अलीकडेच जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रत्येक तालुक्याचे प्रतिबिंब उमटले आहे. दगड, मुरूम, माती, वाळू अशा प्रकारच्या गौण खनिजांचा उपसा करताना शासकीय खजिन्यात रॉयल्टीची रक्कम जमा करावी लागते. याशिवाय बेकायदा उत्खनन व वाहतुकीच्या दंडापोटी मिळणारी रक्कम आणि तलाठ्यांद्वारे वसूल केला जाणारा जमिनीचा करही याच खात्यात जमा होतो. यासाठी प्रत्येक तालुक्याला विशिष्ट उद्दिष्ट दिलेले असते. त्यानुसार वर्षभर ही वसुली केली जाते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार प्रत्यक्ष वसुलीची रक्कम ही उद्दिष्टाच्या तुलनेत नेहमीच अधिक असते. परंतु अकोल्याने यावर्षी मिळवलेले यश हे अतुलनीय आहे. या तालुक्याला वर्षभरात २१ कोटी ७२ लाख १० हजार रुपये वसुल करावयाचे होते. प्रत्यक्षात ही वसुली १०५ टक्के म्हणजे २२ कोटी ७८ लाख ९८ हजार रुपये झाली आहे. ही वसुली जिल्ह्याच्या एकूण वसुलीच्या ३० टक्के एवढी प्रचंड आहे. 


जिल्हा प्रशासन दुसऱ्या क्रमांकावर 
जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार १३ कोटी ४५ लाख एवढ्या रकमेसह जिल्हाधिकारी कार्यालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतर सर्व तालुक्यांचे आकडे हे दहा कोटी रुपयांपेक्षा कमी असून ते ६९ लाख ते ६ कोटी ७५ लाख या रकमेच्या दरम्यान आहे. 

बातम्या आणखी आहेत...