आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला : फवारणीने मृत्यू; उपसमितीचा महिनाभरात अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - फवारणी दरम्यानच्या मृत्यूनंतर संबंधितांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी शासनाने मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. शनिवारी गठित झालेल्या सदर समितीला एक महिन्याच्या आत अहवाल मागितला असून त्या अहवालातच मदतीची प्रक्रिया स्पष्ट केली जाणार आहे.  


राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री या समितीचे अध्यक्ष असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि मदत व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री हे तीन लोकप्रतिनिधी या समितीचे सदस्य आहेत. तर याच खात्याचे अपर मुख्य सचिव हे पाचवे सदस्य म्हणून या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.  शासनाने या समितीला महिनाभराचा वेळ दिला असून या दरम्यान मदत देण्याबाबतच्या धोरणाचा मसुदा निश्चित करावा, असे म्हटले आहे. दरम्यान समितीचा अहवाल म्हणजेच समितीच्या शिफारसी राहणार असून त्या शिफारसींनुसारच संबंधितांच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. त्यामुळे ही समिती काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.   शेतात फवारणी करताना विषबाधा झाली आणि पुढे उपचारादरम्यान मृत्यू ओढवला, अशा अनेक घटना विदर्भात शेतकरी आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यात झाल्या. 

बातम्या आणखी आहेत...