आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार; पक्ष निरीक्षकांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसंग्राम संघटनेने घेतला अाहे. यासाठी जिल्हा निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात अाली अाहे. 


यंदा हाेणाऱ्या जिल्हा परिषद, त्यानंतर हाेणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी रणनीती अाखण्यास प्रारंभ केला. यापूर्वी कांॅग्रेसच्या कार्यकर्ता शिबिराला प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित हाेते. त्यानंतर मनसेचे राज्य नेत्यांनी विधानसभा िनहाय चाचपणी केली हाेती. शिवसेनेचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी तालुकानिहाय मेळावे घेतले. दरम्यान अाता शिवसंग्राम संघटनेनेही राजकीय दृष्ट्या ताकद दाखवण्यासाठी हालचाली सुरु केल्या अाहेत. काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते अा. विनायकराव मेटे यांनी अकोल्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली हाेती. त्यानंतर अकोल्यात मेळावा घेतला हाेता. 


सत्तेतील सहभागी 'शिवसंग्राम' करणार अांदाेलन
शिवसंग्राम संघटनेची राज्यस्तरीय बैठक अामदार विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अकोला ,वाशीम, नागपूर, धुळे, नंदुरबार, जिल्हा परिषद निवडणूका तसेच अहमदनगर महानगरपालिका निवडणुक शिवसंग्राम संघटना आपल्या पूर्ण सामर्थ्यासह लढेल, यावर चर्चा झाली. संघटना राज्यातील प्रश्नावर आक्रमक लढण्याचा निर्णय घेण्यात अाला. अकोला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी शिवसंग्राम युवक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे देण्यात आली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, डॉ. भारती लव्हेकर, मुंबई अध्यक्ष दिलीपराव माने, प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव पवार, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आमरे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अकोला युवक जिल्हाध्यक्ष अक्षय झटाले पाटील अादी उपस्थित होते. 


भारतीय जनता पक्षाला अाव्हान देण्याचा प्रयत्न 
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघ शिवसंग्राम साठी साेडण्याचे निश्चित झाले हाेते. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी खेचून अाणली. शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी निवडणुकीत उडी घेतली. परिणामी भाजपला पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घमासान राजकीय लढाई हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...