आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो अकोलेकरांनी मोर्णा स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात सुरु असलेल्या ‘मिशन क्लीन मोर्णा’चा आजचा नववा शनिवार होता.
आजच्या श्रमदानादरम्यान दगडी पुलाजवळील गुलजारपुरा भागातून वाहणाऱ्या मोर्णेचा काठ स्वच्छ करण्यात आला. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, वाशीमच्या जिल्हा पोलिस अधीक्षक तथा पाण्डेय यांच्या अर्धांगिनी मोक्षदा पाटील, महापौर विजय अग्रवाल व जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर प्रामुख्याने सहभागी झाले होते.
आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटीचे डॉ. कृष्णमुरारी शर्मा यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली. नगरसेवक अजय वाघमारे, शशी चोपडे, आशिष पवित्रकार व उषा विरक, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार राजेश्वर हांडे व राहुल तायडे यांच्यासह पोलिस निरीक्षक गजानन मराठे, गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे, मनपाचे कैलास पुंडे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर अंबुले, कवायत इन्चार्ज केशव घाटे व सोनाजी चांभारे, शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. संजय तिडके, विदर्भ जल विद्यूत प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता भारत धोंगळे, राम कुटे, गजानन भांबुरकर, गटविकास अधिकारी दिलीप पाटील, शुअर विन ॲकॅडमीचे विद्यार्थी, नेहरू
युवा केंद्राचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, अकोला डेन्टल असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्यकर्ते, महसूल व मनपा कर्मचारी यांच्यासह पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षणार्थींनीही अभियानात सहभाग घेतला.
‘जलसंपदा, क्रीडा’चेही श्रमदान
जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांच्या नेतृत्वात या विभागाच्या चारशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांनीही आजच्या मोहिमेत भाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी व क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सतीश भट यांच्यासह क्रीडा प्रबोधिनी आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या विदयार्थ्यांनीही श्रमदान केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.