आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अंनिस'ने हाणून पाडला दगडखेड येथील भानामतीचा प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बाळापूर तालुक्यातील निंबा जवळील दगडखेड येथील एका घरात मागील १५ ते २० दिवसांपासून भानामतीचे प्रकार सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने गावात जावून नागरिकांचे प्रबोधन केल्यानंतर हा प्रकार थांबला. 


घरात दिवसातून दोन-तीन वेळा विविध ठिकाणी कुणी तरी शौच करणे, त्याच्या बाजूलाच धान्याने घरातील विशिष्ट सदस्यांची नावे व तारीख लिहिलेली असणे, हळदी-कुंकवाने स्वस्तिक व इतर काही डिझाइन काढण्याचे प्रकार सुरु होते. जाणे असे प्रकार घडत होते. यामुळे गावातील लहान-थोरांमध्ये भानामती-जादूटोणा या विषयी दहशत पसरली होती. अशी घटना घडत असल्याची माहिती बाळापूर तालुका संघटक अमोल ठाकरे यांना मिळाली. त्यांनी सदर प्रकाराची माहिती जिल्हा पदाधिकाऱ्यांना कळवली. ज्यांच्या घरी हे प्रकार घडत होते. त्यांनीच सदर प्रकार बंद करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे ४ जुलैला लेखी तक्रार दिली. त्यानुसार अंनिसचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले, महिला संघटिका संध्याताई देशमुख, युवा संघटक अॅड.अनिल लव्हाळे, अॅड.शेषराव गव्हाळे, हरीश आवारे, कौशिक पाठक, श्यामभाऊ देशमुख व बाळापूर तालुका संघटक अमोल ठाकरे यांनी ८ जुलै रोजी दगडखेड गावात जाऊन घडत असलेल्या प्रकाराची शहानिशा केली, गावकऱ्यांशी संवाद साधून भानामती-करणी-जादूटोणा या सर्व मानवी मनाच्या कल्पना मानवनिर्मित असतात असे सांगून त्यांच्या मनातील भीती दूर केली व सदर प्रकारामागील उद्देश व हे प्रकार घडवून आणणारा व्यक्ती शोधून त्याचेही समुपदेशन केले. पुन्हा असा प्रकार घडल्यास पोलिसांत तक्रार करून गुन्हे दाखल करण्याचेही बजावले आहे.

बातम्या आणखी आहेत...