आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराजांची अस्थिकलश यात्रा विदर्भात; दहाव्याचे क्रियाकर्म संपन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश्वर(खरगोन) - भय्यू महाराज यांची अस्थिकलश यात्रा विदर्भात काढण्यात येणार आहे. याशिवाय ऋषी संकुल आश्रम खामगाव येथे नवरात्री, दत्त जयंती, गुरू पौर्णिमा आदी कार्यक्रमांत येणाऱ्या अनुयायांची संख्या पाहता सूर्योदय आश्रमात समाधी बांधण्याची इच्छा या आश्रमाचे प्रमुख एन.टी. देशमुख यांनी महाराजांची कन्या कुहू व पत्नी आयुषी यांच्याजवळ व्यक्त केली आहे. 


भय्यू महाराज ७ जून रोजी खामगाव आश्रमात आले होते. संपूर्ण विदर्भातून अस्थिकलश यात्रा काढली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान भय्यू महाराजांचा नववा व दहावा क्रियाकर्म विधी नर्मदेच्या बडघाटवर गुरुवारी झाला. कन्या कुहूने पूजा केली. पंख. राजेंद्र जोशींनी महाराष्ट्रीय पद्धतीने विधी केले. यादरम्यान डॉ. आयुषी उपस्थित होत्या. मात्र, दोघींमध्ये संवाद झाला नाही. अकरावा व बाराव्याचा कार्यक्रमही नर्मदा नदी किनाऱ्यावर होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...