आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बन्सीप्रसाद ठाकूर हत्याकांडातील तिसऱ्या आरोपीला पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बन्सीप्रसाद ठाकूर हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीला न्यायालयाने १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी तर दोन आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. ९ डिसेंबर २०१६ रोजी हिंगणा म्हैसपूरचे उपसरपंच बन्सीप्रसाद ठाकूर यांची धारदार शस्त्रांनी गळा कापून हत्या करण्यात आली होती. 


या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून हिंगणा म्हैसपूर येथील रहिवासी अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर व कापसी रोड येथील रहिवासी बंटी रामकरन केवट या दोघांना अटक केली होती. पोलिसांनी या आरोपीकडून शस्त्र जप्त केले. तसेच या दोन्ही आरोपींना दोनदा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तिसरा आरोपी विशाल राजपाल याला रविवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता या आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आणखी मुख्य दोन आरोपी पोलिसांनी निश्चित केले असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...