आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमजयंती उत्सव: प्रबाेधनात्मक देखावे, निळे झेंडे अन् 'जय भीम'चा गजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - धगधगता निखारा- जय भीमचा नारा, काळाेख्या अंधारात लखलखते हा सूर्य- परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य, उद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, सोनियाची उगवली सकाळ; जन्मास आले भीम बाळ, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे- रंजल्या गांजल्याचा दिनदाता होता रे,.....असा गजर...प्रबाेधनात्मक देखावे...निळे झेंडे....पंचशील ध्वज...पताका... अशा भारावून टाकणाऱ्या वातावरणात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शहरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात अाल्या. अस्तित्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे शिवराय ते भीमराय भीमोत्सव हा कार्यक्रम डाबकी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरु असून, १४ एप्रिल राेजी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर जयंतीनिमित्त संध्याकाळी मिरवणूक काढली. भीमराज सेनेतर्फे भीम जन्मोत्सव मिरवणुकीचे अयाेजन केले होते.

 

जिल्ह्यात शनिवारी ठिकठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली काढल्या. जठारपेठ, खदान, जुने शहरासह शहराच्या विविध भागांमधून दुचाकी रॅली काढल्या. यात तरुणांचा सहभाग हाेता. बहुतांश मिरवणुकांचा समारोप अशाेक वाटिकेत झाला. मिरवणुकांत सहभागी झालेल्या युवकांनी वाटिकेतील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर, भगवान गाैतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करुन त्यांचा अभिवादन केले.

 

दरम्यान, शनिवारी सायंकाळी डाबकी राेडवर मिरवणूक काढली. मिरवणुकीचे अायाेजन शिवराय ते भीमराय भीमोत्सवाअंतर्गत केले. या मिरवणुकीसाठी भीमराज सेना अध्यक्ष आकाश शिरसाट यांच्यासह, राहुल शिरसाट, गौतम गवई, नीलेश शिरसाट, सागर शिरसाट, पवन शिरसाट, राहुल इंगळे, पंकज इंगोले, सोनू शेगोकार, आकाश गावंडे, सनी शिरसाट, वैभव खरात, शशिकांत शिरसाट, अमित मोरे, दिनेश वाग यांनी पुढाकार घेतला हाेता. मिरवणुकीस राजू इनामदार, सुरेंद्र वाकाेडे, अाबा शिरसाट, अजय शिरसाट, आशिष सावळे, उमेश गाेपनारायण, सागर इंगळे, अाकाश गावंडे, अविनाश इंगळे, मनाेज शिरसाट, दिनेश गवई, अतुल तेलमाेरे, किरण पळसपगार, प्रवीण गवई, राहुल इंगळे, वैभव खरात, नीलेश शिरसाट, विकास इंगळे, चिंटू पळसपगार अादी सहभागी झाले हाेते.

 

अाज बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम
डाबकी राेडवरील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मैदानावर हाेत असलेल्या शिवराय ते भीमराय या भीमोत्सवाअंतर्गत १५ एप्रिल राेजी शाहीर देवा अंभोरे व सपना खरात यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम हाेणार अाहे. या वेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहतील. यासोबतच १६ एप्रिल राेजी कपिल ढोके व डॉ. अभय पाटील यांचे व्याख्यान हाेणार असून, यावेळी आमदार गोवर्धन शर्मा राहतील. अक्षयपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम १७ एप्रिल राेजी होणार आहे. १९ एप्रिलला कव्वाली व बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम लुकमान शाह हे सादर करणार अाहेत. या वेळी विशेष उपस्थितीमध्ये अर्जून ऊर्फ नानाभाऊ पगारे (नाशिक) हे राहतील. २० व २१ एप्रिल राेजी नृत्य स्पर्धा हाेणार अाहे.

 

अशी निघाली मिरवणूक
शनिवारी डाबकी राेडवरील रेल्वे गेटजवळ असलेल्या लुंबिनी नगरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक रावनगर समाेरुन, अाश्रय नगर, डाबकी राेडवरुन काढली. समाराेप डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मैदानावर झाला. मिरवणुकीत सजवलेल्या वाहनांवर डाॅ. बाबासाहेब अांबेडकर, भगवान गाैतम बुद्ध यांच्या मूर्ती विराजमान हाेत्या. या वाहनांवर रोषणाईदेखील केली हाेती.

 

डिजेवर तरुणाई थिरकली
डाबकी राेडवरुन निघालेल्या मिरवणुकीत डिजेच्या तालावर तरुणाईने थिरकली. डिजेवर इतिहासाला उजाळा देणारी, सामाजिक संदेश देणारी गिते वाजवली. वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊ नये, यासाठी मिरवणूक रस्त्याच्या एका बाजूने जात हाेत हाेती. मिरवणुकीत महिला-तरुणी सहभागी झाल्या हाेत्या. त्यांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवकांनी कडेही केले हाेते.

 

शीत पेयाचे शहरात वितरण
मिरवणूक मार्गावर शीतपेयांचे वितरण केले. शीतपेय प्राशन केल्यानंतर प्लास्टिकचे ग्लास रस्त्यावर फेकून अस्वच्छता निर्माण हाेऊ नये ,यासाठी ड्रमची व्यवस्था केली हाेती. या ड्रममध्ये वापरलेले ग्लास टाकण्यात येत हाेते. अनेक ठिकाणी रांगाेळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत केले हाेते. मिरवणूक मार्गावरील चाैकांमध्ये डाॅ. अांबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. या ठिकाणी अाकर्षक राेषणाईही केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...