आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसभांना ब्रेक; चार व्यतिरिक्त सभांसाठी घ्यावी लागेल परवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- उठसूठ ग्रामसभा घेण्याच्या प्रकाराला ग्राम विकास विभागाच्या अादेशाने ब्रेक लागला अाहे. नव्या निर्णयानुसार अाता मे, अाॅगस्ट, नाेव्हेंबर महिन्यात आणि् २६ जानेवारी राेजी ग्रामसभांचे अायाेजन करण्यात येणार असून, या चार व्यतिरिक्त ग्रामसभा घेण्यासाठी ग्राम विकास विभागाची परवानगी घ्यावी लागणार अाहे. या निर्णयाचे ग्रामसेवक संघटनेने स्वागत केले असून, त्यामुळे ग्रामसभा नियाेजनामागील परिणामकारकता वाढेल, असा दावा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी केला अाहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात ५३३ ग्रामपंचायतीमध्ये हाेणार असून जिल्ह्यात ३०० ग्रामसेवक कार्यरत अाहेत. ग्राम सभांच्या या निर्णयाची प्रत जिल्हा परिषदेला पाठवण्यात अाली अाहे. 


जिल्ह्यात वर्षातून चार ग्रामसभांव्यतिरिक्त शासनाच्या विविध विभागांकडून राबवण्यात येणाऱ्या याेजना-कार्यक्रमांच्याअनुषंगांने ग्रामसभा अायाेजित करण्यात येतात. ग्रामपंचायतींतर्फे ग्राम पंचायत अधिनियमातील विविध तरतुदींनुसार ग्रामसभा अायाेजित करण्यात येतात. या विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात येतात. अचानक अायाेजित करणाऱ्या येणाऱ्या सभांमुळे सरासरी ग्राम सभांच्या संख्या वाढतच असून, सभांना अल्प प्रतिसाद मिळताे. परिणामी ग्रामसभांच्या अायाेजनामागील उद्देशच सफल हाेत नाही. तसेच काही सभांमध्ये सुयोग्य चर्चा न हाेता काही विपरीत घटनाही घडतात. याला ग्रामसेवकाला सामोरे जावे लागते. या प्रक्रियेचा ताणही ग्रामसेवकांवर येताे. या सर्व बाबींचा विचार करुन ग्रामसभांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय २७ एप्रिल राेजी ग्राम विकास विभागाने जारी केला. 


असे अाहे सध्याचे चित्र
सध्या जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका अार्थिक वर्षात राष्ट्रीय-राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिवशी ग्राम सभांचे नियाेजन करण्यात येते. यामध्ये १ मे-महाराष्ट्र दिन, १५ अाॅगस्ट (स्वातंत्र्य दिन), २ अाॅक्टाेबर (महात्मा गांधी जयंती) आणि २६ जानेवारीचा (प्रजासत्ताक दिन) समावेश अाहे. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने नाेव्हेंबर महिन्यातही ग्रामसभा अायाेजित करण्यात येते. 


यानंतर असे हाेईल ग्रामसभांचे अायाेजन
१) शासनाच्या विभागांना मे, अाॅगस्ट, नाेव्हेंबर महिन्यात आणि २६ जानेवारी राेजी ग्राम सभांमध्ये एखाद्या विषय ठेवायचा असल्यास त्या विभागाला याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवावी लागणार अाहे. 
२) उपरोक्त (मे, अाॅगस्ट, नाेव्हेंबर महिन्यात आणि २६ जानेवारी ) चार व्यतिरिक्त ग्रामसभा अायाेजित करावयाची असल्यास संबंधित विभागाला ग्राम विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला लागणार अाहे. ग्राम विकास विभागाकडून त्या अनुषंगाने विचार करण्यात येईल आणि इतरही विभाग व ग्राम पंचायतशी निगडित विषयांवर सभा घेण्याचे िज.प.ला कळवण्यात येणार अाहे. 
३) शासनाच्या इतर विभागांनी परस्पर जिल्हा परिषदांना ग्रामसभांबाबत कळवल्यास जिल्हा परिषदेला ग्राम विकास विभागाकडून मार्गदर्शन मागवावे लागणार अाहे. 


निर्णयाचे स्वागत 
ग्रामसंभासंदर्भात ग्राम विकास विकास विभागाच्या निर्णयाचे स्वागतच अाहे, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवी काटे यांचे म्हणणे अाहे. या निर्णयामुळे ग्रामसभा अायाेजनामागील उद्देश सफल हाेणार असून, सभांची फलनिष्पत्तीचे प्रमाणही वाढेल, असाही दावा रवी काटे यांनी केला अाहे. 


... हे कार्यक्रम हाेणारच 
२६ जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय किंवा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या दिनांकास नियमित ग्रामसभा अायाेजित करण्यात येणार नसल्याचे ग्राम विकास विभागाने नवीन निर्णयात स्पष्ट केले अाहे. मात्र संबंधित दिनाच्या दिवशी ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर कार्यक्रम-उपक्रम अथवा त्या दिवशी शासनाला काही महत्त्वाचा संदेश-प्रबाेधन कार्यक्रम अायाेजित करण्यात यावेत, असे अादेशात स्पष्ट करण्यात अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...