आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामोदे कुटुंबातील आत्महत्या प्रकरण: अवैध सावकारीमधील दोन्ही आरोपींना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- अवैध सावकारी प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवस अगोदर नामंजूर करून त्या आरोपींना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निर्मला कबाडे या आरोपी महिलेने १२ डिसेंबर रोजी शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या आरोपीला अटक करून आज येथील न्यायालयात उभे केले असता १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रकाश गावंडे याला आज १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली आहे. 


येथील जोहार्ले ले आऊट मधील देवेंद्र जामोदे त्याचे वडील श्रीराम जामोदे भाऊ नरेंद्र जामोदे या तिघांनी २४ सप्टेंबर रोजी रात्री अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. या तिघांना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अकोला येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान नरेंद्र जामोदे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी देवेंद्र जामोदे याच्या तक्रारीवरून अवैध सावकार निर्मला कबाडे, प्रकाश गावंडे अन्य आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यु. के. जाधव नापोकाँ. कैलास चव्हाण हे स्वत: करीत होते. नंतर निर्मला कबाडे प्रकाश गावंडे हे फरार झाले. दरम्यान त्यांनी जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अर्ज सादर केला. कोर्टाने त्यांचा हा अर्ज खारीज केला होता. 

बातम्या आणखी आहेत...