आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- सांगलीतील अनिकेत काेथळे याच्या काेठडीतील मृत्यूनंतर पाेलिसांकडून कैद्यांना मिळणारी ‘थर्ड डिग्री’ पुन्हा राज्यभर चर्चेत अाली अाहे. काेठडीतील मृत्यू राेखण्यासाठी उच्च न्यायालयानेही सरकारला चांगलेच धारेवर धरले हाेते. त्यामुळे पोलिस यंत्रणेविरोधातील रोष वाढला होता. याच पार्श्वभूमीवर अाता कोठडीत मारहाण करणाऱ्या पाेलिसांवर नजर ठेवण्यासाठी राज्यातील सर्वच पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर २५ पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०१६ रोजी पोलिस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यामधील प्रत्येक कॉरिडॉर, रूम व लॉकअप यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत आदेश जारी केले होते. ही बाब विचारात घेऊन सरकारने प्रायोगिक तत्त्वावर २५ पोलिस ठाण्यांमधील चार्ज रूम, लॉकअप, मार्गिका, स्टेशन हाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आता राज्यातील सर्वच पोलिस ठाण्यांत टप्प्याटप्प्याने कॅमेरे लावण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
महिला कक्ष, विश्रांती कक्ष वगळणार
पोलिस ठाण्यांमधील पोलिस निरीक्षकांचे दालन, चार्ज रूम, लॉकअप, मार्गिका, स्टेशन हाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस स्थानकांचा संपूर्ण परिसर व सर्व कक्षांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. यातून महिला कक्ष व विश्रांती कक्ष वगळण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल करण्यापूर्वीच पोलिसांकडून होते मारहाण
अनेकदा संशयित म्हणून आरोपीला पोलिस पोलिस ठाण्यात घेऊन येतात. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करतात. धाकापोटी अनेकदा आरोपी गुन्हा कबूल करतो. अशा गैरप्रकाराला आळा बसण्यास पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे मैलाचा दगड ठरणार आहेत.
हेही वाचा,
> जीएसटीत तीनऐवजी एकाच रिटर्नचा विचार; पुढील बैठकीत हाेणार निर्णय...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.