आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कैद्यांची स्थिती सुधारण्यासाठी सहकार्य; नीता ठाकरे यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महानगरातील तुरुंगात महिलांसाठी खुले तुरुंग उभारण्यात आले असून महिला कैद्यांच्या स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून राज्य महिला आमूलाग्र बदल व सुधारणा करीत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी दिली. ठाकरे यांनी सोमवारी अकोला कारागृहास भेट देऊन स्थानीय शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महिला कैद्यांच्या संदर्भात आयोगाच्या उपक्रमांची माहिती दिली. 


अकोला कारागृहात एकूण कैद्यांच्या पैकी महिला कैद्यांची संख्या चौदा असून त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.त्यांच्या स्वयंरोजगार व इतर रोजागाराभिमुख प्रशिक्षणासाठी महिला आयोगाकडे अनेक योजना असून राज्यातील तुरुंग प्रशासनाच्या माध्यमातून तुरुंगात अशा खितपत पडलेल्या महिला कैद्यांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोग करीत असल्याचे त्यांनी सांगून आर्थिक कारणामुळे महिला कैद्यांना जामिनासाठी अडचणी येत असतात.सबब सामाजिक संघटनांनी त्यांच्यासाठी हिरीरीने पुढे येऊन जामिनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले.अकोला तुरुंगात सिद्धदोष महिला कैद्यांची संख्या आठ असून न्यायाधीन महिला कैदी या तीन आहेत.


तसेच भादंवि ३०२ च्या न्याय बंदी महिला तीन असून अशा चौदा महिला तुरुंगात असल्याचे त्यांनी सांगितले.महिला आयोगाकडे महिला कैद्यांना प्रशिक्षण ,त्यांची नियमित आरोग्य तपासणी,शैक्षणिक साहित्याचा पुरवठा आदी बाबी नियमात बसून महिला कैद्यांची एकंदर स्थिती सुधारण्यासाठी तुरुंग प्रशासनासोबत सहकार्य करून आयोग त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी तुरुंग अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव,वरिष्ठ तुरुंग अधिकारी दयानंद सोरठे, महिला अत्याचार तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ.सपना लांडे, जिल्हा समन्वयक जितेंद्र बगाटे, कारागृह शिपाई गणेश खटके,रणजित ठवकर आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...