आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला - यंदा हाेणाऱ्या जिल्हा परिषद अाणि त्यानंतर हाेऊ घातलेल्या लाेकसभा लाेकसभा अाणि विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागले असून, काँग्रेसने २५ मार्च राेजी प्रशिक्षण कार्यक्रमाचे अायाेजन केले अाहे. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्षा अशाेक चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अाणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे येणार अाहेत.
अकाेला जिल्हा राजकीय दृष्ट्या भाजपमय असून, सर्वच विराेधी पक्ष जिल्ह्यात पाय राेवण्यासाठी प्रयत्न करीत अाहेत. काँग्रेसला तर दाेन पेक्षा जास्त दशकांपासून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अपयशच अाले अाहे. सन २०१४मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वळावर लढलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तर काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाला हाेता. त्यानंतर झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये बाळापूर व पातूर वगळता काँग्रेसचा विजय झाला, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसमुक्त जिल्हा हाेण्याच्या दिशेने भाजपकडून प्रयत्न सुरु असून, या कार्यात काँग्रेस पक्षातूनही हातभार लावण्यात येत असल्याचे विश्लेषकांचे मत अाहे.
अनेक पदाधिकारी अनभिज्ञ : काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील मतभेद नवीन नाहीत. अनेक पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमांपासून अनभिज्ञ असतात. गतवर्षीच्या सदस्य नाेंदणीबाबतही अनेक पदाधिकाऱ्यांना माहितीच नव्हती.
प्रशिक्षणासाठी स्थानिक नेते एकत्र येतील पण मने जुळतील काय ?
पटेल समाजाचे गुजरात येथील युवा नेते हार्दीक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अकाेल्यात २३ मार्च राेजी शेतकरी व बेराेजगार युवकांच्या एल्गार मेळावा हाेणार अाहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतला अाहे. मेळावा स्वराज्य भवन येथे हाेणार अाहे.या मेळाव्याला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून, त्यानंतर २५ मार्चच्या कार्यक्रमातही काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी एकत्र येणार अाहेत.स्थानिक नेते कार्यक्रमानिमित्त एकत्र येत असले तरी निवडणुकांमध्ये ते पक्षासाठी काम करतील की नाही, हे नंतरच दिसून येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.