आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळले भजे, पकोडे; मोदी यांनी सुशिक्षित तरुणांचा विश्वासघात केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - सत्तेत आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु सत्तेत येऊन चार वर्षाचा कालावधी उलटून गेला असताना ते युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी एका मुलाखतीत युवकांनी नोकरीसाठी शासनाच्या भरवशावर न राहता पकोडे विकून रोजगार निर्माण करावा, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा युवक काँग्रेसच्या वतीने आज १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी भजे व पकोडे तळून व त्याचे वाटप करून निषेध केला आहे.

 

खामगाव  
सुशिक्षित युवक संघटित होऊन विश्वासघातकी मोदी सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली. युवक कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या वतीने येथील एकबोटे चौकात आज १४ फेब्रुवारी रोजी सकाळी पकोडे वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, बाजार समिती सभापती संतोष टाले, महिला तालुकाध्यक्षा सौ.भारती पाटील, सौ.अर्चनाताई टाले, सरस्वतीताई खासने, कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीमोदद्ीन, तालुकाध्यक्ष बबलू पठाण, युवक कॉंग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार चंदेल, नगरसेवक अमेयकुमार सानंदा, भूषण शिंदे, नगरसेवक अब्दुल रसीद अब्दुल लतीफ, इब्राहिम खॉ सुभान खॉ, शेख फारुख बिसमिल्ला, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दामोदर वडोदे, अशोक मुळे आदींनी सहभाग घेतला.

 

जळगाव जामोद  
येथील आंदोलनात युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पराग पाटील, नितीन ढगे, अमर पाचपोर, नंदू बाठे, डॉ. प्रशांत राजपूत, सय्यद हुसेन राही, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई ढोकणे, प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष राजु पाटील, युनूस खान, नगरसेवक अर्जुन घोलप, संदीप मानकर, श्रीकृष्ण केदार, मोदसिर काजी, प्रवीण भोपळे, सचिन हरमकार,अरुण दीघडे, मयूर राऊत, राहुल ढोले, पंकज घुते, केतन विभानी, विश्वास पाटील, मोहन बोडखे, जावेद खान, अॅड. राजपूत, आशिष वायझोडे, माणिक खोद्रे, कादर खान, प्रमोद सपकाळ, कैलास पाटील, अजहर देशमुख, दिनेश काकडे, गणेश मोरे, विलास मानकर, शकिर खान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

मेहकर  
युवक काँग्रेसच्या वतीने आज नागसेन चौक जानेफळ फाटा या ठिकाणी पकोडा आंदोलन करून पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या आंदोलनात नगरसेवक शैलेश बावस्कर, भीमशक्तीचे कैलास सुखधाने, तालुका काँग्रेस अध्यक्ष देवानंद पवार, शहराध्यक्ष कलीम खान, मो अलीम ताहेर, नगरसेवक शैलेश बावस्कर, पंकज हजारी,अलियार खान, संजय ढाकरके, नीलेश सोमण, तौफिक खान, संजय सुळकर, धीरज अंभोरे, वसीम कुरेशी, दिलीप बोरे, आशिष देशमुख, फिरोज काजी, नीलेश बावस्कर, नावेद खान , प्रकाश सुखधाने, सुनील अंभोरे यांच्या सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सूत्रसंचालन युनूस पटेल यांनी तर आभार युवक काँग्रेसचे रवी मिस्किन यांनी केले.

 

नांदुरा
पंतप्रधान पकोडा रोजगार योजनेचा युवक काँग्रेसच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभा अध्यक्ष निलेशभाऊ पाऊलझगडे यांनी केले. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पकोडे वाटप करून केंद्र शासनासह पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनात राजेश पाटील, तालुकाध्यक्ष भगवान धांडे, बाजार समिती सभापती बलदेवराव चोपडे, साहेबराव फोसे वैभव देशमुख, विनल मिरगे, विजय ढोले, शंकर बोदडे, नरेश शर्मा, एकबाल खान, आसिफ खान, शिवाजी पाटील, संदीप देशमुख, सचिन पांडव, , शेजोळे, नारायण झाल्टे, अनवर भाई, दिनकर गारमोडे, सहभागी झाले होते.


संग्रामपूर  
तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज १४ फेब्रुवारी रोजी वरवट बकाल येथील बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी पकोडे तयार केले. आंदोलनात कॉग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, संतोष राजनकार, मनोहर बोराखडे, तेजराव मारोडे, सरपंच श्रीकृष्ण दातार, संतोष टाकळकर, अमोल ताथोड, गणेश टापरे, शे,जलील, युवराज टाकळकर, हरिदास दामधर, शे. शारुख, मुना ठेकेदार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...