आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसींच्या विविध मागण्या घेऊन निघालेली संविधान न्याय यात्रा ३ मे रोजी बुलडाण्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- ओबीसी जातीनिहाय देशव्यापी जनगणना अभियानांतर्गत शोषित पिछडा जनजाती संघटन नवी दिल्ली तसेच बहुजन चळवळीतील विविध सामाजिक संघटना व सर्व ओबीसी नेते ओबीसींसोबतच एस सी, एस.टी,शेतकरी,शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे जयंती दिनापासून सामाजिक न्याय यात्रा निघाली आहे. या न्याय यात्रेचे उद््घाटन आ.बळीराम सिरस्कार यांचे हस्ते ११ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातून निघालेली ही यात्रा ३ मे रोजी बुलडाणा शहरात पोहोचत आहे. 


ओबीसींची जनगणना इंग्रजांनी १९३१ साली केली होती. त्यानंतर अाजपर्यंत ओबीसींची जनगणना करण्यात आली नाही. त्यावेळी ५२ टक्के असलेली ही संख्या ६० ते ६५ टक्के इतकी झाली असू शकते. जनगणना नसल्याने ओबीसींच्या योजना नाही. त्यामुळे ओबीसींचा शैक्षणिक, आर्थिक,राजकीय विकास किती झाला. हे निश्चित सांगता येत नाही. ओबीसी करता सरकार कोणतीच पावले उचलत नाही. हा मोठा अन्याय समाजावर आहे. त्यामुळेच सरकारने ओबीसींची जनगणना करावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, मुस्लिम समाजासाठी रंगनाथन सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासह अनेक मागण्याकरता या यात्रेचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचे प्रमुख आयोजक ओबीसीचे राष्ट्रीय नेते माजी खासदार आ.हरिभाऊ राठोड तसेच अनु.जाती जनजाती अतिपिछडा सेवा संघाचे डॉ.ज्ञानेश्वर गोटे, प्रा. सुषमा अंधारे, प्रा.श्रावण देवरे, डॉ.बबनराव तायवाडे, कल्याण दळे,इंजि.प्रदीप ढोबळे,प्रा.नागोराव पांचाळ,प्रा.सुशीला मोराळे, शंकरराव लिंगे, अशोक सोनवणे,प्रा.विलास काळे प्रचार प्रसार करीत आहे. तरी बुलडाणा शहरात येणाऱ्या या यात्रेत मेळाव्याचे ठिकाणी सायंकाळी ७ वाजता सहभागी व्हा, असे आवाहन शोषित पिछडा जनजाती संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा.सदानंद माळी, बारा बलुतेदार संघटनेच दामोदर बिडवे, अॅड.शरद राखोंडे, कुणाल पैठणकर, डॉ.राजेश्वर उबरहंडे, मुमताज सर, प्रा.डी.आर.माळी, के.ओ.बावस्कर, विष्णू उबाळे, राजु टारपे, नंदिनीताई टारपे, जि. प. सदस्या जयश्रीताई शेळके, विश्वनाथ माळी, शंकर मलवार, प्रा.संतोष आंबेकर, राजेश हेलगे,आकाश दळवी यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...