आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला पाच लाखांत विकले; नराधमाने सलग 20 दिवस केला आत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एका अल्पवयीन मुलीला गुजरात मध्ये नेले. तेथे तिला एका जणाला पाच लाख रुपयात विकले. त्याने तिच्यावर सतत वीस दिवस अत्याचार केले. त्याच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने तेथून पलायन करत मंगळवारी १० एप्रिलला थेट खदान पोलिस ठाणे गाठले. दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. 


या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीला आईला भेटण्यासाठी अहमदाबाद येथे भेटायला घेऊन जात असल्याचे सांगून तिला गुजरात राज्यातील भरूच येथील एका व्यक्तीला पाच लाख रुपयांमध्ये विकले. त्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावर सतत २० दिवस अत्याचार केला. दरम्यान ती अल्पवयीन मुलगी तेथून पळून आल्यानंतर तिने खदान पोलिस स्टेशनला पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक, अत्याचार, पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला आहे. 


पुढील स्लाइडवर वाचा, वीस दिवस सतत आत्याचार...

बातम्या आणखी आहेत...