आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला- राज्यात गेल्या हंगामापासून हैदोस घालत असलेल्या कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी युवाराष्ट्र संस्था धडक व व्यापक मोहिमेला राबवणार अाहे. ही माेिहम प्रामुख्याने विदर्भ,मराठवाड्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात राबवण्यात येणार अाहे.
कापसवरील गुलाबी बोन्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या हंगामात राज्यातील कापसाच्या ४२ टक्के घट झाली हाेती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह उद्योग व कामगारांनाही मोठा फटका सहन करावा लागला हाेता. या पार्श्वभूमीवर युवाराष्ट्र संस्थेने एकत्मिक किड नियंत्रणासाठी पुढाकार घेतला अाहे. "युवाराष्ट्र" चे पदाधिकारी गत काही महिन्यांपासून गुलाबी बोंड अळीच्या प्रश्नांवर काम करीत अाहेत. गुलाबी बाेंड अळीच्या एकात्मिक किड नियंत्रणासाठी ११ मार्च रोजी याच विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांची मार्गदर्शन कार्यशाळा अायाेजित करण्यात अाली हाेती. या कार्यशाळेत युवाराष्ट्रचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते. या मोहिमेअंतर्गत शर्थी चे प्रयत्न करणार असल्याचे युवाराष्ट्रचे डॉ निलेश पाटील व विलास ताथोड यांनी कळविले आहे.
अशी राबवणार माेहिम
"युवाराष्ट्र संघटना या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांत किमान दोन रथ व १० तज्ञांची टीम तयार गठित करणार अाहे. या टिमसाेबत प्रोजेकटर्स, स्लाईड शो,एकात्मिक नियंत्रणासाठी मार्गदर्शक साहित्य व तज्ञांचे मार्गदर्शन ना नफा ना तोटा तत्वावर कामगंध सापळे राहणार अाहेत. ,बोन्ड अळीची लागण, नुकसान पातळी,एकात्मिक नियोजन,कीटकनाशके याबाबत सविस्तर मार्गदर्शन व उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत पोहोवण्यात येणार अाहेत.
शेतकऱ्यांचे अार्थिक नुकसान
गतवर्षी विदर्भात बाेंड अळीच्या अाक्रमणामुळे कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले हाेते. अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यांनी किटकनाशक फवारणीही केली. मात्र पिके तर वाचलीच नाही, उलट फवारणीतून विषबाधा झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. परिणामी शेतकऱ्यांना अार्थिक फटका बसला हाेता. त्यामुळे अाता बाेंड अळीच्या मुद्यावर व्यापकप्रमाणात जनजागृति करण्यात येणार अाहे.
असा अाहे गुजरात पॅटर्न
सन २०१४-१५ च्या हंगामात गुजरातमध्ये कापशी पिकावर गुलाबी बोंड अळीने अाक्रमण केले हाेते. हा प्रार्दूभाव राेखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे व प्रभावी व अचूक उपाय याेजना करणे गरजेचे असते. ही बाब हेरून गुजरातमध्ये राज्य सरकार,स्वयंसेवी संस्था,कंपन्या,माध्यमे आदींनी एकत्रितपणे लढाच उभारला हाेता. त्याच धरतीवर अाता विदर्भ,मराठवाड्यातील कापूस उत्पादक क्षेत्रांत एकात्मिक कीड नियंत्रणासाठी धडक व व्यापक मोहीम लवकरच "युवाराष्ट्र" राबवणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.