आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉ. निखिल गांधीविरुद्ध गुन्हा; अकोट पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- स्वत:जवळ कोणतीही वैध वैद्यकीय पदवी व वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर निखिल नंदकिशोर गांधी याच्यावर अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


हा बोगस डॉक्टर अकोट शहरातील डॉ. जपसरे व डॉ. केला यांच्या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तीन डॉक्टरांचे एक पथक तपासणीसाठी सिटी केअर हॉस्पिटल अकोट येथे पाठवून तपासणी केली असता निखिल गांधी याच्याकडे वैध वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र व वैध वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मागितला असता हा डॉक्टर अकोट शहरातून गायब झाला. तो आजगायत अकोटमध्ये आलाच नाही. अकोटमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारीसुद्धा केल्या होत्या. परंतु, कार्यवाही झाली नाही. दरम्यान, सिटी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टर श्याम सुंदर वल्लभदास केला यांनी पोलिस स्टेशन अकोट शहर येथे निखिल गांधी याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यात म्हटले की, 'निखिल गांधी याने स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून त्यांची फसवणूक केली. त्याच्याकडे वैद्यकीय परवानाबाबत विचारपूस केली असता त्याच्या वडिलांचा परवाना दाखवून खोटा दस्तऐवज खरा आहे, असे भासवले व त्यांच्याकडून त्यांचे सिटी केअर हॉस्पिटलमध्ये एक खोली घेऊन तेथे रुग्णांची तपासणी करून फसवणूक केली'. पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी त्वरित तक्रारीची सखोल पडताळणी करून त्यात तथ्य आढळल्याने निखिल नंदकिशोर गांधी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...