आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह पुलाखाली सापडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- तालुक्यातील माना पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पोही - लंघापूर येथील शिलाबाई अशोक मुळे ही महिला गावालगतच्या खरकाडी नाल्याच्या पुरात ७ जुलैला वाहून गेली होती. सोमवारी ९ जुलैला सकाळी ११ वाजता तिचा मृतदेह उमा नदी पात्रात रोहणा पुलाच्या खाली सापडला. 


पिंजर येथील दीपक सदाफळे यांच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक व शासकीय आपत्कालीन पथक यांनी तीन दिवस शोध मोहीम राबवली. पोही गावापासून १५ कि.मी. उमा व पूर्णा नदी पात्रात लाईत, शेलू बोंडे, लाखपुरी ,सांगवी, घुंगशी बॅरेजपर्यंत शोध मोहीम राबवली. पण एवढ्या प्रयत्नानंतर पोहीपासून दोन कि.मी.वरील रोहणा पुलाखाली महिलेचा मृतदेह सोमवारी ९ जुलैला दिसून आला. आपत्कालीन पथक दुसरीकडे शोधत असताना रोहणा येथील प्रल्हाद बन्सोड हेही महिलेचा शोध घेत होते. पुलाखाली उतरले असता त्यांना तिथे दुर्गंधी आल्याने शोध घेतला असता पुलाखाली काट्यावर अडकून पडलेला मृतदेह आढळला. मृतदेहाची घटनास्थळीच उत्तरीय तपासणी केली. मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला. अधिक तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चंदू पाटील, विनोद तायडे, संदीप पवार, प्रवीण ठाकरे, महिला उज्ज्वला इंगोले करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...