आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला- कीटकजन्य आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने विभागामध्ये राबवण्यात आलेल्या हिवताप नियंत्रण मोहिमेमुळे गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा घट झालेली दिसते. या भागातून हिवतापाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहायक संचालक (हिवताप) डॉ. अभिनव भुते यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
२०१८ च्या एप्रिल महिन्यापर्यंत साधा मलेरिया प्लाझ्मोडियम विवॅक्स (पी. व्ही.) ची प्रकरणे आढळली परंतु प्लाझ्मोडियम फाल्सीपारम (पी. एफ.) जीवघेण्या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही. मराठवाड्यात जालना जिल्ह्यामध्ये मलेरियाच्या उच्चाटनाबाबत चांगले काम झाले असून ते मॉडेल समोर ठेवून या भागामध्येही मलेरिया आजारावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
२०१४ पासून विभागामध्ये मलेरियाबाबत झालेल्या उपायांची माहिती या प्रमाणे आहे. २१४ साली अकोला जिल्ह्यात ३,१५,००४ जणांचे रक्त नमने घेण्यात आले. त्यापैकी पी. एफ. म्हणजे जीवघेण्या आजाराचे २०, वाशीम जिल्ह्यात २,२९,४७७ नमुने तपासले. पीएफचा एकही रुग्ण नाही. अमरावती जिल्ह्यात ५,६१,८५७ नमुन्यांपैकी १२३ पी. एफ., बुलडाणा जिल्ह्यात ४,८४,६०५ नमुन्यातून १४ पी. एफ., तर, यवतमाळ जिल्ह्यात ६,००,२४२ नमुन्यापैकी २५ रुग्ण पी. एफ. चे आढळले. २०१५ साली जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या अकोला जिल्ह्यात १९, वाशीम जिल्ह्यात १, अमरावती जिल्ह्यात ५९, बुलडाण्यात ४, आणि वतमाळमध्ये २१ रुग्ण आढळले. २०१६ मध्ये अकोला जिल्ह्यात पी. एफ. रुग्ण १३, वाशीममध्ये १, अमरावतीत ३६, बुलडाणा ३, यवतमाळमध्ये ५. २०१७ साली अकोला जिल्हा ५, वाशीम जिल्हा निरंक, अमरावती जिल्ह्यात २४, बुलडाण्यात ०, यवतमाळमध्ये ७, तर, मार्च २०१८ पर्यंत विभागामध्ये जीवघेण्या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही.
वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यामध्ये रुग्णांची कमी होत असलेली संख्या पाहता २०१८ अखेर त्या जिल्ह्यातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. तर अकोला जिल्ह्यासाठी २०२० चे उद्दिष्ट ठेवले आहे. हिवताप नियंत्रण मोहिमेमुळे मलेरियाची रुग्ण संख्या कमी झाली अाहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.