आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंना अटक न केल्यास पुन्हा आंदोलन, भारिप-बमसं प्रदेशाध्यक्ष सोनोने यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असलेले संभाजी भिडे यांना अद्यापही अटक न होणे म्हणजे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना तत्काळ अटक न केल्यास भारिप बमसं आंदोलन उभे करेल, असा इशारा भारिप बमसंचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला. ते बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

बुधवारी मिलिंद एकबोटे यांचा सप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी भारिप बमसंने अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अशोक सोनोने यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून अॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. परंतु संभाजी भिडे यांना ४० दिवस झाले असूनसुद्धा अटक करण्यात आली नाही. भिडे यांनासरकार पाठीशी घालत असल्यामुळे त्यांची हिम्मत वाढली आहे व आपणास कोणीही हात लावू शकत नाही, असे त्यांस वाटायला लागले आहे. शासनाचे पाठराखणीशिवाय हे होऊ शकत नाही. शासनाच्या धोरणाचा निषेध करीत असून आगामी काळात राज्यभर आंदोलन उभे करु, असेही सोनोने म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, राजेंद्र पातोडे, डी.एन. खंडारे, दशरथ भांडे, सम्राट सुरवाडे, गजानन गवई, अरुंधती सिरसाट, शोभा शेळके, मंतोष मोहोळ, शेख साबिर,आसिफ खान, पराग गवई, राहूल अहिरे, नितिन डोंगरे, रवी पाटील, के.बी. मंडाळे उपस्थित होते. दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी यापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता,हे विशेष.

 

भारिप-बमसंला कुणी कमी लेखू नये
भारिप- बमसंशिवाय राज्यात सत्तास्थापन करता येणार नाही. भारिपला कमी समजण्याचा कुणी प्रयत्न करू नये, गाव तेथे शाखा व शाखा ते फलक आणि प्रत्येक घरात भारिपचा कार्यकर्ता असेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पक्षाचे काम सुरु आहे. भारिपकडे लोकसभा उमेदवारीसाठी आतापासूनच उड्या पडत आहेत, असे भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी यावेळी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...