आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेला फसवणाऱ्या सरकारला आता खाली खेचा : धनंजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- अच्छे दिन आनेवाले है... असे म्हणत लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचा खोटा विश्वास दाखवून जनतेला फसवणाऱ्या राज्यातील आणि देशातील सरकारला खाली खेचा, असे आवाहन करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. एवढेच नाही तर, आता शिवसेनेने लोगोवरील वाघाचे चित्र काढून तिथे शेळीचे चित्र लावावे एवढी दयनीय अवस्था शिवसेनेची झाली असून, केवळ ५ मंत्रिपदासाठी लाचार झालेल्या शिवसेनेला सत्तेला लाथ मारता येत नसेल तर लाथ मारायचे ट्रेनिंग देण्यासाठी एक जनावर भेट देऊ, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते ना. धनंजय मुंडे यांनी केले. सभास्थळी एकच हशा पिकला. 


दुसरबीड येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आज, ११ जून रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. 


स्व. गोपीनाथ मंुडे साहेबांचा अपमान आपण सहन करणार नाही 
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या विचारपीठाला आम्ही आर. आर. आबा पाटील यांचे नाव दिले, मात्र भाजप आपल्या अधिवेशनाच्या विचारपीठाला स्व. गोपीनाथ मुंढे यांचे नाव देऊ शकले नाही. तर ऊस तोड कामगार महामंडळाची घोषणा झाली आणि ते मंडळच रद्द करण्यात आले, याबद्दल संताप व्यक्त करत धनंजय मंुडे म्हणाले की, एकीकडे निवडणूक आली की, मत मागताना वारस असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्व. गोपीनाथ मंुडे यांचा अपमान होत असताना त्यावर भाष्यदेखील करायचे नाही. असला दुटप्पीपणा आपल्याला पटत नाही, कारण संघर्षाचा वारसा आपण घेतलेला असल्याने स्व. मंुडे साहेबांचा अपमान आपण सहन करणार नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते ना. धनंजय मंुडे यांनी केले. 


आता मत पेरणीसाठी तयार राहा: डॉ. शिंगणे 
या वेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही कार्यकर्त्यांना आता मत पेरणीसाठी तयार राहा, असे आवाहन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना केले. दुसरबीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मेळाव्याला भव्य प्रतिसाद लाभला. 

बातम्या आणखी आहेत...