आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनी सवर्णांचा मागासवर्गीयांवर बहिष्कार, उपासमारीची वेळ; चौघांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर (बुलडाणा)- प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भीम गीत वाजविण्यास मज्जाव केल्यावरून दोन समाजात तेढ निर्माण झाली. त्यानंतर सवर्णांनी गावातील मागासवर्गीय बौध्द समाजावर बहिष्कार टाकला. ही घटना २७ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी आज, ३० जानेवारी रोजी तामगाव पोलिसांनी सवर्ण समाजातील चार आरोपींविरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 


तालुक्यातील पंचाळा येथील विजय सावंग यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, पंचाळा बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


एसडीपीओंच्या भेटीनंतर चौघांविरुध्द गुन्हे दाखल 
दरम्यान, आज उपविभागीय पोलिस अधिकारी बोबडे यांनी तामगाव पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर चौकशीअंती तक्रारीवरून अमोल खानझोड, शंकर खानझोड, पांड्ुरंग खानझोड व नंदू खानझोड यांच्याविरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बोबडे हे करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...