आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्सिल न वापरता वयाच्या पंच्याहत्तरीतही ते पेनाने रेखाटतात चित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- व्यक्ती तितक्या प्रवृत्ती व व्यक्ती तेवढे छंद असतात. असाच छंद शेगाव येथील शिवनारायण लहाने यांनी जोपासला आहे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी त्यांनी हा छंद सोडला नाही. पंधराव्या वर्षापासून चित्र रेखाटणारे लहाने हे पेन्सिल व खोडरबरचा वापर न करता सरळ सरळ पेनाच्या साह्याने अप्रतिम व हुबेहुब असे चित्र रेखाटत आहेत. 


वयोवृद्ध् शिवनारायण यांनी पेनाच्या साह्याने आतापर्यंत थोर महापुरुष, निसर्ग, प्राणी, संत, देवि देवता, नट व नट्यांची अगणित अशी चित्रे रेखाटली आहेत. एवढेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीने त्यांना भेटून चित्र रेखाटण्याचे म्हटले असता, ते कुठलाही मोबदला न घेता आपल्या जवळील कागदावर पेनाच्या साह्याने त्या व्यक्तीचे हुबेहुब चित्र काही मिनिटातच रेखाटून देत आहेत. शेगावसह अन्य जिल्ह्यातील नागरिक सुद्धा चित्र रेखाटनासाठी त्यांच्याकडे येत आहेत. शिक्षण घेण्याचा अथवा छंद जोपासण्याला वयाची अट नसते, हे शिवनारायण लहाने यांनी आपल्या छंदातून दाखवून दिले आहेत. त्यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेवून इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वयाच्या पंधरा वर्षापासून आजही मोठ्या आवडीने ते आपला छंद जोपासत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात पासष्ट ते पंचाहत्तर वर्षाचे वृद्ध मंडळी जर्जर झाल्याचे दिसून येतात. परंतु ते ७६ वर्षातही तरुणाला लाजवेल असे चित्र रेखाटण्यासह अन्य कामे सुद्धा करीत आहेत, हे विशेष. 


साठ वर्षांपासून जोपासला चित्र रेखाटण्याचा छंद 
पंधराव्या वर्षापासून चित्र रेखाटण्याचा छंद लागला आहे. आजही हा छंद मी जोपासत आहेत. चित्र रेखाटनासाठी माझ्याकडे अनेक लोक येतात. त्याचा कुठलाही मोबदला न घेता त्यांचे हुबेहुब चित्र रेखाटून देत आहे. युवकांनी सुद्धा व्यसनाच्या नादी न लागता एखादी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
- शिवनारायण लहाने, चित्रकार 

बातम्या आणखी आहेत...