आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेगावातील खलवाडी, मातंगपुऱ्यात अतिक्रमित 36 घरे, दुकाने जमिनदोस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज, २७ एप्रिल रोजी शहरातील मातंगपुरा परिसरातील १७ अतिक्रमित घरे व दुकाने तसेच खलवाडीतील १९ दुकाने असे एकूण ३६ दुकाने व अतिक्रमीत घरावर बुलडोजर चढवण्यात आला. या कारवाईमुळे अनेेकाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी मातंगपुरा व खलवाडी परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. येत्या काही दिवसात खाली करण्यात आलेली ही जागा गजानन महाराज संस्थानला देण्यात येणार आहे.


उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयप्रमाणे शहर विकास आरखड्यांतर्गत खलवाडी या ठिकाणी पार्किंग करण्यासाठी तेथील १९ दुकांदारांना बाजारातील बांधलेल्या पालिकेच्या संकुलातील दुकाने देण्यासाठी गजानन महाराज संस्थानने प्रत्येकी २२ लाख रुपये या प्रमाणे भरणा केला आहे. ती दुकाने या व्यावसायिकांना खरेदी खत प्रमाणे त्यांचे नावावर करुन द्यावे. मातंग पुऱ्यातील १७ घरे व दुकानदारांना दुकानाचे अर्धे गाळे नागरपालिकेने नऊ महिन्यात बांधून द्यावे. तोपर्यंत त्यांना दर महिन्याला ५ हजार रुपये महीना द्यावा, असा निर्णय दिला होता. हस्तांतरीत केल्या जाणाऱ्या जागेतील बाधीतांना न्यायालयाच्या आदेशानुसार जागा मोकळी करून देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधीतांनी जागा मोकळी करून दिली नाही. त्यामुळे आज सकाळपासुनच अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली. ती सायंकाळपर्यंत सुरूच होती. मातंगपुरा परिसरातील एका कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे घर पाडल्या जात असतांना एकच आकांडतांडव केला. हा अपवाद वगळता ही कारवाई शांततेत झाली. दरम्यान गांधी चौक, डॉ.आंबेडकर चौक, लहुजी वस्ताद चौक, मंदिराचे पश्चिम गेट, इक्बाल चौक आदी भागांच्या तोंडावर रहदारीला रोख लावला होता. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत, पालीका कर्मचारी, भूमी अभिलेख विभागाचे संजय खरोटे, भूमापक प्रफुल्ल बाळापूरे, उपविभागीय महसूल अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार गणेश पवार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्याम घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. 

 
विजयश्री गेस्ट हाऊस कारवाईतून सुटले 
आजच्या कारवाईत विजय गेस्ट हाऊस पाडण्यात येणार होते. मात्र भूमि अभिलेख विभागाकडून ही जागा बाधीतांच्या यादीत येत नसल्याचे पत्र पालीकेला प्राप्त झाल्याने विजयश्री गेस्ट हाऊस कारवाईतुन सुटले आहे. 


पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त 
या अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामध्ये सात पोलीस निरीक्षक, ३३ पीएसआय, २४० पोलीस कर्मचारी, ४० वाहतूक पोलीस, ४० महिला कर्मचारी, दोन दंगा काबू पथक, एक वॉटर कॅनन, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड सुध्दा तैनात करण्यात आले होते. 


पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त 
या अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामध्ये सात पोलीस निरीक्षक, ३३ पीएसआय, २४० पोलीस कर्मचारी, ४० वाहतूक पोलीस, ४० महिला कर्मचारी, दोन दंगा काबू पथक, एक वॉटर कॅनन, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड सुध्दा तैनात करण्यात आले होते. 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई 
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम सकाळी आठ वाजेपासून सुरू करण्यात आली असून त्यामध्ये मातंग पुरा परिसरातील सतरा अतिक्रमीत घरे व दुकाने तसेच खळवाडी परिसरातील १९ दुकाने जमिनदोस्त करण्यात आली आहेत. खाली करण्यात आलेला परिसर गजानन महाराज संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
- अतुल पंत, मुख्याधिकारी

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...