आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेमध्ये सहभागी करुन घेण्याची अपेक्षा कायम : आमदार विनायक मेटे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भाजपने निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत असून, संभाव्य विस्तारात तरी सत्तेत सहभागी करुन घेण्यात येईल, अशी अपेक्षा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष अामदार विनायक मेटे यांनी रविवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केली. मात्र सरकार संघटनेच्या भूमिकेनुसारच काम करीत असल्याने समाधान अाहे, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणार, असून त्या दृष्टीकाेनातून बांधणी सुरु असल्याचेही स्पष्ट केले. 


या वेळी प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, युवक अाघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, शिवा माेहाेड उपस्थित हाेते. मुंबईतील शिवस्मारक, मराठा अारक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याचा दावा अा. मेटे यांनी केला. स्मारकाची उंची २१० ऐवजी २१२ मीटर उंच केली. यापूर्वी चीनमधील एका स्मारकाची उंची २०८ वरुन २१० केल्याने ही उंची वाढवली. मराठा अारक्षणाचा सकारात्मक अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार अाहे. उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने न लागल्यास प्रसंगी सरकारतर्फे सर्वाेच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल. मात्र ताेपर्यंत शिक्षण, राेजगार, शिष्यवृत्तीसह इतरही प्रश्न मार्गी लावल्याचा दावा मेटे यांनी केला. अा. मेटे यांनी सत्तेत सहभागी करुन न घेतल्याबाबत खंत व्यक्त केली. भाजपने शब्द न पाळल्याने संघटनेत नाराजी अाहे. मात्र समाजाचे प्रश्न मार्गी लागत असल्याने समाधानी असून, सत्ता हे ध्येय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


लोकसभेसाठी चाचपणी
२०१९ मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर चाचपणी करण्यात येत असून, एक किंवा दाेन जागांवर लक्ष केंद्रीत करणार अाहे. या जागांची राजकीय पृष्ठभूमीवर, सामाजिक स्थिती, पक्ष बांधणीचा अाढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. कदाचित सर्व स्थिती प्रतिकूल असल्यास अर्थात निवडणूक जिंकता येणार नाही, अशी स्थिती असल्यास लोकसभा न लढण्याचाही निर्णय घेण्यात येईल. याचा निर्णय चाचपणीअंतीच घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


...त्यामुळे तिकडे परत जाण्याचा प्रश्नच नाही 
अनेक वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कांॅग्रेसने प्रश्न साेडवले नाहीत. त्यामुळे पुन्हा ितकडे जाण्याचा प्रश्नच नसल्याचे अा. मेटे यांनी प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. सध्याच्या सरकारने काही प्रश्न मार्गी लावले असून, अनेक प्रश्न सुटायचे अाहेत. प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु असून, सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद िमळत असल्याचेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...