आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारकडून हरभऱ्याच्या खरेदीला मिळाली मुदतवाढ, नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शासनाच्या हरभरा खरेदी प्रक्रियेला १३ जूनपर्यंत मुदत वाढ मिळाल्याचा अादेश दि. महाराष्ट्र स्टेट काे-अाॅपरेटिव्ह फेडरेशनने बुधवारी जारी केला असून याची प्रत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली अाहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्हयातील हरभरा खरेदीसाठी नाेंदणी केलेल्या २० हजार १४८ शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला अाहे. 


शासनाच्या तूर व हरभरा खरेदी प्रक्रियेला शासकीय यंत्रणांचा बेताल कारभार व त्यांचे खासगी यंत्रणेशी असलेले साटेलाेटे यामुळे खीळ बसली हाेती. बाहेरील जिल्ह्यातील हरभरा अकाेल्यातील गोदामांमध्ये साठवण्यात अाली हाेती. अकाेल्यातील हरभरा साठवण्यासाठी जागाच नव्हती; परिणामी हरभरा खरेदीची प्रक्रिया संथ हाेती, असाही अाराेप झाला. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला मुदत वाढ देण्याची मागणी सर्वचस्तरावरुन झाली हाेती. 


हरभऱ्यासाठी २० हजार १४८ शेतकरी प्रतीक्षेत: महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अकाेला, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी, वाडेगाव व पारस अाणि विदर्भ काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अकाेट व मूर्तिजापूर येथे हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली. २० हजार १४८ शेतकरी हरभरा माेजणीच्या प्रतीक्षेत अाहेत.

 
तुरीला मुदतवाढ नाही?
४५९५५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी अाॅनलाईन नाेंदणी केली. पुढीलप्रमाणे शेतकऱ्यांची तूर पडून अाहे. अकाेला केंद्रातील- ८१५३, तेल्हारा-१८०८, पातूर-२९७७, बार्शिटाकळी-३४५३, वाडेगाव-३९६७, पारस-२४४०, अकाेट-५३३६ अाणि मूर्तिजापूर येथील ३७०१ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती. अशी संख्या ३१८३५ अाहे. 


काय अाहे अादेशात 
महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनच्या अादेशात पाच मुद्द्यांचा उहापाेह करण्यात अाला अाहे. खरेदी १३ जून संध्याकाळी ५ पर्यंतच करण्यात येणार असून, त्यानंतर एनईएमएचे पाेर्टल उघडण्यात येणार नाही. खरेदी झालेला हरभरा तातडीने वखार महामंडळाच्या गाेदामात साठवण्यात यावा. पावसाची शक्यता असल्याने हरभरा भिजणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही अादेशात देण्यात अाली अाहे. 


... तर पुन्हा हाेईल घाेळ 
२ फेब्रुवारीपासून खरेदी सुरु करण्यात अाली. मात्र खरेदी राेज करण्यात येत नव्हती. २ फेब्रुवारी राेजी सुरु झालेली तूर खरेदी १५ मे राेजी खरेदीची मुदत संपुष्टात अाली हाेती. १५मे पर्यंत सहा केंद्रांमध्ये एकूण ५६४ दिवस खरेदी झाली. मात्र प्रत्यक्षात २५२ दिवस खरेदी हाेऊ शकली. ३१२ दिवस खरेदी बंद हाेती. केवळ ५५ टक्केच दिवस तूर खरेदी सुरु हाेती. याला जबाबदार काेण असा सवाल उपस्थित करण्यात येत अाहे. त्यामुळे अाता १३ जूनपर्यंत मुदत वाढ मिळाली असल्याने राेजी प्रभावीपणे खरेदीची प्रक्रिया व्हावी, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...