आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- देऊळगाव मही येथील सेंट्रल बँक शाखेमधून नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी वारंवार चकरा मारूनही कर्ज मिळाले नाही. यामुळे युवा शेतकऱ्याने बुलडाणा येथील शिवशंकरनगरमधील राहत्या घरी १३ जूनच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. 


मूळचे हतेडी खुर्द येथील रहिवासी असलेले शेतकरी नितीन गुलाबराव जाधव, वय ३० वर्षे यांच्या मालकीची अडीच एकर शेती डोढ्रा ता. देऊळगाव राजा शिवारात आहे. सद्य:स्थितीत ते शेतकरी बुलडाणा येथील शिवशंकरनगरमध्ये राहून शेती वहिती करायचे. 

बातम्या आणखी आहेत...