आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पभूधारक शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांच्या नावाने शेतीचे लेखपत्र; चार एकर शेती मुख्यमंत्र्यांच्या नावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर- अल्पभूधारक शेतकऱ्याने जुन्या कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज काढले. कर्जमाफी जाहीर झाली, परंतु ती न मिळाल्यामुळे नैराश्यात असलेल्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. यातूनच त्यांनी १०० रुपयांच्या मुद्रांत पेपरवर चार एकर शेती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पत्रलेख करून जानेवारीत कार्यालयाला पाठविला. दहा महिन्यांपासून शेतकरी प्रमोद कुटे यांचा प्रशासनाशी लढा सुरू असून राज्य शासनाला तीन पत्र पाठवून कर्जमाफीची मागणी केली आहे. 


दरम्यान कुटे यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयासोबत देखील पत्रव्यवहार केला आहे. कर्जमाफी न मिळाल्यास सर्वोंच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे इच्छा मरणासाठीही विनंती अर्ज करणार असल्याचे कुटे यांनी सांगितले. साईनगर येथील रहिवाशी शेतकरी प्रमोद महादेव कुटे यांची बोरगाव वैराळे, ता. बाळापूर, जि. अकोला येथे १ हेक्टर ५६ आर शेती आहे. मागील वर्षी नापिकीचा सामना करावा लागला असतानाही कुटे यांनी या वर्षी नातेवाईकांकडून उसनवारी करीत व पत्नीचे दागिने विकून जुन्या कर्जाचा भरणा करीत नवीन ८१ हजार रुपयांचे कर्ज काढले होते. 

 

दरम्यान कर्जमाफी जाहीर होवून प्रत्यक्षात कर्जमाफी न मिळाल्याने आर्थीक अडचणीने ग्रासले आहे. त्यातूनच त्यांनी १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवर मुख्यमंत्र्याच्या नावे लिहिलेल्या लेखपत्रात आपल्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यानी आपली चार एकर शेती विकून बँकेचे थकीत कर्ज वसूल करावे आणि उरलेले पैसे थकबाकीदारांना द्यावे तसेच आलेली रक्कम इतर कर्जबजारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. पत्नीला मुलीचे शिक्षण व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता स्वच्छता विभागात कंत्राटी नोकरी द्यावी असे पत्रलेखात नमूद आहे. 


वर्गणीतून केली पेरणी 
मागील वर्षीची मशागत, पेरणी आदीचे पैसै संबंधितांना देणी न झाल्यामुळे यंदा खरीपाची पेरणी कुटे यांच्या शेतात बुधवारपर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र गुरवारी (दि. १२) खांबोरा येथील रामू ढोरे, भाष्कर ढोरे, प्रल्हाद ढोरे, प्रवीण ढोरे यांनी वर्गणी करून प्रमोद कुटे यांच्या शेतात पेरणी केल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...