आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; पत्नी बालबाल बचावली; पारडी येथील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेफळ- स्वतःच्या शेतात फवारणी करण्यासाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या घटनेत शेतकऱ्याची पत्नी बालबाल बचावली आहे. ही घटना आज १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देळप शिवारात घडली. 


पारडी येथील शेतकरी ग्यानु दशरथ पवार वय ३८ याचे देळप शिवारात शेत आहे. दरम्यान आज ग्यानु व त्याची पत्नी हे दोघे शेतात फवारणी करण्यासाठी गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी दोघेही पती पत्नी झाडाखाली जात असताना अचानक ग्यानु पवार यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी थोड्या अंतरावर असल्यामुळे ती या विजेपासून बचावली. घटनेची माहिती मिळताच तलाठी सीमा चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर अहवाल तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे सादर केला. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. या घटनेतील मृतकाच्या वारसास तातडीने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...