आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळी: शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लावावे; डॉ. पी. डब्ल्यू. नेमाडे यांचा शेतकऱ्यांना सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- २०१८-१९च्या हंगामामध्ये कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळी येऊ नये म्हणून प्रत्येक ग्राम पंचायत, जिनिंग फॅक्टरी, कापूस संकलन केंद्रामध्ये प्रत्येकी १५ ते २० कामगंध सापळे आतापासून जून महिन्यापर्यंत लावावे. गुलाबी बोंडअळीचे पतंग पकडून नष्ट करण्याची मोहीम विविध पातळीवर राबवण्याची गरज आहे, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक डॉ. टी. एच. राठोड, डॉ. पी. डब्ल्यू. नेमाडे यांनी म्हटले आहे. 


या हंगामामध्ये बोंडअळ्यांमुळे कपाशीवर संक्रांत आली तसे पुढच्या हंगामामध्ये होऊ नये याची काळजी आतापासूनच घेण्याची गरज आहे याकडेही संशोधकांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी कामगंध सापळे लावणे, कपाशीची शेवटची वेचणी संपताच विभागीय, गाव पातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी. म्हणजे शेतातील किडकी बोंडे अळ्यासहीत नष्ट होतील. पिकाची उलंगवाडी जास्तीतजास्त १५-३१ जानेवारीपर्यंत संपवावी. पऱ्हाट्याची सेंद्रीय खत तयार करण्यासाठी विल्हेवाट लावावी, कोणत्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. तसेच पिकाची फेरपालट करावी म्हमजे कपाशीच्या शेतामध्ये पुन्हा पुढील हंगामात कपाशीचे पीक घेऊ नये. बीटी कपाशीच्या चारही बाजूने बीटी वाणाबरोबर असलेल्या बीगर बीटी (रेफुजी) ची लागवड करावी म्हणजे बोंडअळ्यांच्या प्रतिकारक पिढ्यांची काही प्रमाणात रोकथाम करता येईल. कोरडवाहू बीटी कपाशीची लागवड जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. 


विद्यापीठाच्या शिफासरीनुसार कोरडवाहू कपाशीची चौफुल्लीवर लागवड करावी जमिनीच्या प्रतवारीनुसार पेरणीचे अंतर निवडावे. नत्र खताचा अतिरेक टाळून संतुलीत वापर करावा म्हणजे, पीक दाटणार नाही. दाटलेल्या हिरव्या लुसलुशीत पिकामध्ये किडींना पोषक वातावरण तयार होणार नाही. पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत होईल. पीक एक महिन्याचे झाल्यावर गुलाबी बोंडअळ्यांच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये प्रती हेक्टरी कामगंध सापळे लावावेत त्याची आमीष वडी (ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी. हे सापळे गाव, विभाग, जिल्हा पातळीवर लावावे. दर आठवड्याने यातील अडकलेले पतंग नष्ट करावे. सतत दोन ते तीन दिवस सरासरी ते १० पतंग सापळा आढळून आल्यास नियंत्रणाचे उपाय योजावे. पीक ३०-४० दिवसाचे झाल्यावर पिकामध्ये प्रती हेक्टरी ट्रायकोकार्ड लावावे (१.५० लक्ष ट्राकोग्राम अंडी, प्रती हेक्टरी) दर १० दिवसांनी असे हंगामामध्ये ते वेळा पिकामध्ये लावल्यास उपयुक्त ठरेल. 


बोंड अवस्थेत ते १० टक्के प्रादुर्भाव आढळल्यास रासायनिक किटकनाशकाचा वापर क्रमप्राप्त ठरते. गरज पडल्यास सर्वप्रथम प्रोफेनोफॉस, थायोडीकार्ब, क्वीनालफॉस या पैकी एका किटकनाशकाचा वापर करावा, असेही डॉ. राठोड, डॉ. नेमाडे यांनी सूचवले आहे.

बातम्या आणखी आहेत...