आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरींचा सुटला तिढा; शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, नियमानुकुलतेसाठी प्रस्ताव पाठवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - सिंचन विहिरींचे अनुदान मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईअाे) कक्षात सहा तास ठोकलेल्या ठिय्या अांदाेलनाला रात्री यश अाले. मागण्या पूर्ण करण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ताक्षराचे लेखी पत्र सीईअाेंनी अांदाेलक शेतकऱ्यांना दिले. यात लक्ष्यांकापेक्षा जादा अाॅनलाईन मंजूर झालेल्या विहिरींना अनुदान वाटप करणे, नरेगाच्या संकेतस्थळावर वर्क काेड तयार न केलेल्या विहिरींना नियमानुकूल करुन घेण्यासाठी शासानाला प्रस्ताव पाठवणे आणि लक्ष्यांकापेक्षा जादा विहिरींना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, या मागण्या पूर्ण करण्यात येईल, असा उल्लेख अाहे. त्यामुळे आता तत्कालीन पाच गटविकास अधिकाऱ्यांसह एकूण १२ पेक्षा जास्त अधिकारी-अभियंत्यांवर कारवाईची हाेणार असल्याने विहिरींच्या अनुदान मंजुरीत लाचखाेरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले अाहे. ठाेस कारवाई केल्याशिवाय जागेवरून उठणारच नाही, असा निर्धार केलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे ताेंड दाबताच नाक उघडल्याचे या अांदाेलनाच्यानिमित्ताने दिसून अाले. शेतकऱ्यांनी कक्षातच मुक्काम करण्याचा इशारा देत स्वत:च्या जेवणाचीही व्यवस्था केली हाेती. परिणामी हादरलेल्या जिल्हा परिषद प्रशासनासमाेर लेखी अाश्वासनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता.

 

पातूर व बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी २०१५मध्ये नरेगाअंतर्गत सिंचन विहिरी खाेदल्या हाेत्या. शेतकऱ्यांना त्यांना २० ते ३० टक्के अनुदानाची रक्कमही मिळाली हाेती. मात्र अनुदानाची रक्कम थकल्याने शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. तरीही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ७ मार्च राेजी जिल्हा परिषदेत धाव घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईअाे) कक्षात ठिय्या अांदाेलन केले हाेते. त्यानंतर आज,बुधवारी १४ मार्च रोजी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना साेबत घेत सीईअाेंना जाब विचारण्यासाठी जिल्हा परिषदेत धडकले. याठिकाणी राेजगार हमी याेजनेचे उपजिल्हाधिकारी अशाेक अमानकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बाळापूरचे गटविकास अधिकरी वाय. डी. शिंदे, भूजल सर्वेक्षणचे बरडे उपस्थित हाेते.


असा हाेईल लाभ
लक्ष्यांपेक्षा जादा व पहिला हप्ता मिळालेल्या बाळापूर तालुक्यात २४६ आणि पातूर तालुक्यात १५४ विहिरींची संकेतस्थळावर नाेंद अाहे. त्यामुळे या एकूण जवळपास ४०० शेतकऱ्यांना लाभ मिळणार अाहे. तसेच अाॅनलाईन न झालेल्या पातूर तालुक्यातील ३४४ आणि बाळापूर तालुक्यातील १८९ अशा एकूण ५३३ विहिरींच्या मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार अाहे. अर्थात अंतिम अाकडेवारीची जुळवणे सुरु असून, यात किंचितसा बदल हाेऊ शकताे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...