आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या नगसेवकांमध्ये झाली तुंबळ हाणामारी; 3 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - शिस्तप्रिय राजकीय पक्ष, असा ठेंभा मिरवणाऱ्या भाजपच्या नगरसेविकेचा पती व नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बार्शिटाकळी राेडवरील एका शेतात घडली. या हाणामारीत तीन जण जखमी असून, एका नगरसेवक पतीच्या पायाला जबर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात अाले. हाणामारीला स्थायी समिती सदस्य निवडीची किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

 

स्थायी समितीला एक वर्षपूर्ण झाल्यानंतर २० फेब्रुवारी राेजी १६ पैकी ८ सदस्यांना ईश्वर चिठ्ठी टाकून निवृत्त करण्यात अाले. स्थायी समितीमधून अाऊट झालेल्या सदस्यांमध्ये भाजपच्या पाच सदस्यांचा समावेश हाेता. यामध्ये भाजपचे हरीश आलिमचंदानी, अजय शर्मा, सुमन गावंडे, योगिता पावसाळे, माधुरी बडोणे यांचा समावेश हाेता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडीवरुन मंगळवारी रात्रीपासूनच इच्छूकांमध्ये चर्चा सुरु झाली. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. याप्रकरणी रात्रीउशिरापर्यंतही पाेलिस ठाण्यात नाेंद नव्हती. याबाबत भाजपचे महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील यांच्याशी माेबाईल फाेनवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

काठ्या, बांबूंचा मारहाणीत वापर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाणीत काठ्या (बल्ल्या) बांबूंचा वापर करण्यात अाला. तसेच काहींच्या मते शस्त्रही काढण्यात अाली. मात्र या माहितीला भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांनी खासगीत बाेलताना नकार दिला.

 

काय झाले शेतात
भाजपचे युवा कार्यकर्ते-पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका पती बार्शिटाकळी राेडवरील एका शेतात जमले. यामध्ये रणजित खेडकर, राहूल देशमुख, गजानन साेनाेने, अजय शर्मा अादींचा समावेश हाेता. या सर्वांमध्ये वाद झाला. काही वेळेतच वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर थाेड्याच वेळेत काही युवक तेथे अाले. त्यांनी भाजपच्या नगरसेविका पती व इतर युवा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत रणजित खेडकर व अजय शर्मा जखमी झाले असून, राहूल देशमुख यांनाही मारहाण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

बातम्या आणखी आहेत...