आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर धावत्या ट्रकला लागली आग, ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा- खामगावहून मलकापूरकडे जात असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना आज ३ मे रोजी दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वडनेर रोड वरील हॉटेल प्रियंका जवळ घडली. 


केमिकल घेवून एक ट्रक खामगावहून मलकापूरकडे जात होता. वडनेर रोडवरील हॉटेल प्रियंका जवळ येताच या ट्रकला अचानक आग लागली. ही घटना लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा करून कॅबीन मधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही वेळातच ट्रकचा समोरील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. भर रस्त्यात ट्रक पेटल्यामुळे दोन्ही बाजुला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती राजू एकडे यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी विजय कोल्हे, महादेव हिंगणकार, प्रमोद मुऱ्हे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यानंतर पाण्याचा मारा करून ट्रकची आग विझविण्यात आली. यावेळी ओम साई फाउंडेशनचे विलास निंबाेळकर, ठाणेदार पाटील, अमोल राऊत, रामधन गवळी, व ललित राठी हे उपस्थित होते. आग लागलेला ट्रक विझविल्यानंतर पुन्हा या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. ही आग दाहकत्या उन्हामुळे किंवा शॉटसर्कीट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेे. 

बातम्या आणखी आहेत...