आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला आग लागून रोकड, कागदपत्रे खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मलकापूरातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला बुधवारी लागलेल्या आगीत लाखोंच्या नाेटांसह महत्त्वाचे दस्तऐवजही जळाले. त्याचा निश्चित अाकडा अद्याप जाहीर झालेला नाही. बँक मॅनेजरने याविषयी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शॉर्टसर्किटमुळे अाग लागल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. 


बँकेच्या अंबिकानगर शाखेतील दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे बँकेत एकच धावपळ उडाली व कर्मचारी बाहेर पडले. नंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. आगीत कॅशियर रूममध्ये असलेली रोकड व महत्त्वाचे दस्तऐवज जळाले. बँकेची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाची पहिली गाडी ४.५० वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. आग आटोक्यात न आल्याने, अग्निशमन विभागाने दुसरी गाडी पाठवली. 


तक्रारीत रक्कम जळाल्याचा उल्लेख 
बँकेच्या व्यवस्थापकाने आमच्याकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. आगीत पैसे जळाल्याचा उल्लेख असला तरी किती रक्कम जळाली हे पंचनाम्यानंतर सांगता येईल, असे बँकेचे म्हणणे आहे. 
- संतोष महल्ले, ठाणेदार खदान पोलिस ठाणे 

बातम्या आणखी आहेत...