आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला, सेमाडोह, कारंजामध्ये विविध अपघातात ५ जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- चिखलदरा येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चार मित्र मैत्रिणीच्या चार चाकी गाडीला अपघात होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सेमाडोह-चिखलदरा मार्गावरील मेमणा फाट्याजवळ (दि. १५) रात्री उशीरा घडली. सलोनी रमेश गोडबोले (१८) रा. पूजा कॉलनी, दस्तुरनगर असे मृतक युवतीचे नाव असून वृत्त लिहिस्तोवर तीन जखमींची नावे कळू शकली नाही. 


मृतक सलोनी ही तिचे दोन मित्र व दोन मैत्रिणी आणि चालक अविनाश सुरेंद्रसिंग येवतीकर (२८) रा. शंकर नगर, अमरावती यांच्यासह स्वत:च्या इंडिका व्हिस्टा (एमएच २७/बीई ३०४१) चारचाकीने चिखलदरा येथे पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान दिवसभर तेथे भटकंती केल्यानंतर ते सेमाडोह येथे गेस्ट हॉऊसवर राहण्यासाठी परत येत होते. मेमणा फाट्याजवळ धुक्यामुळे पुढील रस्ता दिसेनासा झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खाली कोसळली. यामध्ये सलोनीचा जागीच मृत्यू झाला, तर चालक अविनाशसह अन्य तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. अमरावती येथे चौघांवरही खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा नोंदवला आहे. साेमवारी (दि. १६) दुपारी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात सलोनीचे शवविच्छेन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेचा तपास चिखलदरा पोलिस ठाण्याचे एपीअाय अाकाश शिंदे, हेकाँ राजकुमार पुरोहित व सुनील सुरजुसे करीत आहेत. 


कारंजात २ अपघात, २ ठार 
कारंजा शहर परिसरात १६ तासात २ अपघातात दोन जण ठार झाल्याच्या घटना १५ जुलै च्या मध्यरात्रीनंतर साडे १२ वाजता व १६ जुलैच्या दुपारी साडे ४ वाजताच्या सुमारास घडल्या. प्राप्त माहितीनुसार अपघाताची पहिली घटना १५ जुलैच्या रात्री साडे ११ वाजता कारंजा दारव्हा मार्गावरील मंगरूळवेश बसस्थानकाजवळ घडली. या घटनेत आरोपी खलीलचा मुलगा गोलु याने आपल्या ताब्यातील एम.एच. ३५ २१७६ क्रमंाकाचा टाटा ४०७ भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून अब्दुल रज्जाक वय ४८ वर्ष रा. अस्ताना कारंजा यांच्या अंगावर घातला. यामध्ये अब्दुल रज्जाक गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक २८२/१८ नोंदवून भादंविच्या कलम २७९, ३०४ अ, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपघाताची दुसरी घटना १६ जुलै रोजी नागपूर औरंगाबाद ध्रुतगती मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर असलेल्या मंगरूळपीर व शेलुबाजार रोड चौफुलीवर घडली. या घटनेत युनुस तुकड्या मोहनावाले हे एमएच ३७ के ९६१५ क्रमांकाच्या दुचाकीने मंगरूळपीरहून कारंजाकडे येत असतांना विरूध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीस जबरदस्त धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार युनुस मोहनावाले वय ४५ वर्ष रा. कोळंबी ता मंगरूळपीर हे खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्याहून अज्ञात ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला. दरम्यान वृत्त लिहेस्तोवर पोलिस घटनास्थळी पोहचले असून, पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होती. अपघाताच्या दोन्ही घटनांचा पुढील तपास कारंजा पो.स्टे.चे ठाणेदार एम.एम.बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पवार व कारंजा शहर पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...