आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनाऱ्यावर काढला सेल्फी; फोटो पाठवल्यानंतर झाले होत्याचे नव्हते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- युवक पहाटे समुद्र किनाऱ्यावर पाेहाेचले...खवळलेल्या समुद्रात उडी घेण्यापूर्वी त्यांनी माेबाईल फाेनमध्ये 'सेल्फी' काढला...हा फाेटाे मित्रांनाही माेबाईल फोनवर पाठवला....त्यानंतर खवळलेल्या समुद्रात त्यांनी उडी घेतली...पंधरा मिनिटानंतर पाच जण दिसेनासे झाले....काही वेळाने तिघांचे मृतदेहच सापडले...एकाला बाहेर काढल्यानंतर ताे विव्हळत हाेता...त्याला वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते...गाेवा येथील समुद्रकिनाऱ्यावर घडलेला हा घटनाक्रम सांगताना उमरी परिसरातील युवकांना गहिवरून अाले. उमरी येथील हाेतकरु युवकांवर काळाने घाला घातल्याने परिसर शाेक सागरात बुडाला अाहे. परिसरातील युवकांमध्ये गाेव्यात घडलेल्या प्रसंगावर दिवसभर खिन्न मनाने चर्चा सुरु हाेती. या चर्चेतून मिळालेली माहिती एेकल्यानंतर संवेदनशील मनाच्या माणसाच्या डाेळ्याच्या कडा अाेल्या झाल्याशिवाय राहत नाहीत. यातील युवक हे क्रिकेटही खेळत असत. 


उमरी परिसरातील विठ्ठल मंदिराच्या अासपास राहणारे युवक दाेन दिवसांपूर्वी गाेव्याला जाण्यासाठी भुसावळ येथे गेले. त्यानंतर ते महालक्ष्मी एक्स्प्रेसने गाेव्यातील मडगाव येथे पाेहाेचले. यात प्रितेश लंकेश्वर नंदागवळी, चेतन नंदागवळी, किरण म्हस्के, शुभम वैद्य, उज्ज्वल वाकाेडे, मिलिंद मुळतकर, अनिकेत कहाळे, अनिकेत तांडे, बंटी काकडे, िवक्की काकडे, श्रीयज वनारे अादींचा समावेश हाेता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे युवक पहाटे ४ वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून टॅक्सी करून ते कळंगुटला गेले आणि समुद्र किनारी पाेहाेचले. त्यापैकी ३ युवक २० मिनिटांनी आढळून आले. मात्र पाण्याबाहेर काढेपर्यंत त्यांनी प्राण गमावला होता. त्यात प्रीतेश गवळी , चंदन गवळी , उज्ज्वल वाकोडे यांचा समावेश आहे. 


बाबा...बाबा...हे एेकायचे राहिलेच
प्रितेश नंदागवळी हा दर्यापूर येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत अाहे. नातेवाईक व परिचितांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात दीड वर्ष पूर्ण हाेणार अाहे. पत्नी गर्भवती असून, ती माहेरी गेली अाहे, असे त्यांनी सांगितले. बाबा....बाबा...हे स्वर कानी पडण्यापूर्वीच प्रितेशवर काळाने घाला घातला. मुळातच प्रितेश व त्याचा भाऊ चेतन हे दाेघेही नम्र हाेते. काेणालाही ते अादरानेच हाक मारत असत. दाेघेही हाेतकरु हाेते, हे सांगताना त्याच्या मित्रांना गहिवरून येत हाेते. 


अाता सकाळी काेण उठवणार 
उज्ज्वल वाकाेडे याला त्याचे मित्र डॅम या नावाने हाक मारत असत. ताे मेकॅनिक. परिचितांच्या वाढदिवसाला ताे न चुकता शुभेच्छा देण्यासाठी जात असे. अकाेला येथून निघण्यापूर्वीही त्याने एका मित्राला वाढदिवसाच्या अॅडव्हांसमध्येच शुभेच्छा देण्यासाठी फाेन केला. 'भावा प्रवासात किंवा गाेव्यातून फाेन लागणार कि नाही, हे सांगता येत नाही; त्यामुळे अाताच वाढदिवसाच्या शुभेच्छा रे.', अशा मित्रत्त्वाच्या शब्दात त्याने संबंधिताशी संवाद साधल्याचे त्याचे मित्र सांगत हाेते. घरात मुलांमध्ये उज्ज्वल ताे एकुलता एक. त्याला एक बहीण. वडिल खासगी वाहन चालक अाहेत. सुखी कुटुंबाला नजर लागली आणि घरातील युवक कायमचा निघून गेला. दाेन दिवसांपूर्वीच त्याने परिसरातील एका काकाचे वाहन दुरुस्त करुन दिले. उज्ज्वल हा क्रिकेटपटू हाेता. दिवसभर काम केल्यानंतर ताे दुसऱ्या दिवशी पहाटेच क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. घरातून निघाल्यानंतर ताे प्रत्येकाला उठवून पुढे जात असे. अाता अाम्हाला सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी काेण उठवणार , असे त्याचे मित्र अाता जड अंत:करणाने विचारत अाहेत. 


मैदानावर काेण खेळणार 
प्रितेश नंदागवळीच्या घरासमाेर मैदान (खुली जागा) अाहे. या ठिकाणी हे युवक हाॅलीबाॅल खेळत असत. युवकांमुळे परिसरात वेगळाच उत्साह असे. मात्र अाता खेळणाऱ्यांपैकी अनेक जण कायमचे निघून गेले. त्यामुळे अाता काेणासाेबत आणि कसे खेळायचे, असा प्रश्न विचारताना त्यांच्या मित्रांच्या डोळ्यांतून अश्रू धारा वाहत हाेत्या. 


युवकांचे नातेवाईक गाेव्याकडे रवाना

समुद्रात दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच शुभम वैद्य आणि किरण म्हस्के यांचे कुटुंबीय गाेव्याकडे रवाना झाले. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभमने सर्वांसाेबत रेल्वेचे अारक्षण केले नव्हते. वेळेवर अारक्षण काढून ताे त्यांच्या सहभागी झाला. उमरी परिसरातील या युवकांचे परिचित आणि मित्र रात्रभर काळजीत हाेते. ठिकठिकाणी अनेक जण खिन्नमनाने चर्चा करीत हाेते. शासकीय सेवेत असलेल्या प्रीतेशच्या अाईने मुलांचा सांभाळ केला. मात्र अाता काळाने दाेन मुलांना हिरावून घेतले. 
खवळलेल्या समुद्रात घेतली उडी...पंधरा मिनिटांनी पाच जण दिसेनासे झाले 


लाॅजचा शाेध अन समुद्राकडे धाव 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे युवक मडगाव रेल्वे स्थानकावर पहाटे ४ च्या सुमारास पाेहाेचले. त्यांनी राहण्यासाठी लाॅज, हाॅटेलचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश अाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट कळंगुट समुद्र किनारा गाठला आणि त्यातच काहींचा घात झाला. 


लाेकप्रतिनिधींना साधला गाेवा सरकारशी संपर्क 
>गाेवा येथे घडलेल्या दुर्घटनेची वार्ता जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. याबाबत अकोला पूर्वचे भाजप अामदार रणधीर सावरकर यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाची संपर्क साधला आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यामार्फत गोवा सरकारशी संपर्क साधला साधला. गाेवा सरकारनेही बेपत्ता मृतदेहांचा शोध तातडीने सुरु केला. दुपारपर्यंत तीन मृतदेहांचा शाेध लागला. या दुर्घटनेबाबत खा. संजय धाेत्रे, अामदार गोवर्धन शर्मा, अा. सावरकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. 
>गाेवा येथे घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच खा. संजय धाेत्रे यांनी गाेव्याचे स्थानिक खासदार अॅड. सवाईकर यांच्याशी संपर्क साधून घटनाक्रम सांगितला. काही वेळाने खा. धाेत्रे यांना खा. सवाईकरांचा फाेन अाला. मृतदेह मडगाव येथील रुग्णालयात हलवण्यात अाले असून, बचाव कार्य सुरु असल्याचे खा. सवाईकर यांनी सांगितले. तसेच सर्वताेपरी मदत करण्याचे अाश्वासनही त्यांनी दिले. अामदार गोवर्धन शर्मा यांनी सुद्धा संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधून तातडीने मदत करण्याची विनंती केली. 


अन् कुटुंबीयांना प्रश्न पडू लागले 
गाेवा येथील दुर्घटनेची वार्ता उमरी परिसरात पसरली. मृतकांच्या नातेवाइकांनाही दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यांनीही उमरी परिसरात धाव घेतली. वर्षातून कधी तरी येणारे अाज घरी का येत अाहेत, ते घराबाहेर काेणाशी काय बाेलत अाहेत, असे एक ना अनेक प्रश्न मृतक युवकाच्या अाईला पडत हाेते. काही वेळाने िसव्हील लाइन्स पोलिसही उज्वलच्या घरी गेले. त्यांनी विचारपूस केल्यानंतर तर उज्वलच्या कुटुंबीयांच्या काळजी वाढली. 

बातम्या आणखी आहेत...