आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार भैय्यासाहेब ठाकुर यांचे मुंबईत निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा- मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील माजी आमदार, काँग्रेसचे निष्ठावान नेते भैय्यासाहेब उर्फ चंद्रकांत रामचंद्रजी ठाकूर यांचे बुधवारी मध्यरात्री मुंबई येथे सोमय्या रुग्णालयात रात्री १ वाजून ४९ ला अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली असून शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता तालुक्यातील मोझरी येथे त्यांच्या शेतात शिंदीपांडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. 


गेल्या दहा दिवसांपासून भैय्यासाहेब ठाकूर मुंबई येथे उपचाराठी दाखल झाले होते. मागील तिन दिवसांपासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारची रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता अमरावती जिल्ह्या वाऱ्यासारखी पसरली. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या मोझरी येथे निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन अमरावती येथे शुक्रवारी सकाळी ७ ते ९ गनेडीवाल ले-आऊट, कॅम्प येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर मोझरी येथे सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत वाड्यासमोर ठेवण्यात येईल. सकाळी ११ वाजता शिंधिपांडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. भैय्यासाहेब ठाकूर यांचा जन्म २८ जानेवारी १९४७ रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मोझरी येथे झाले. 


पुढील शिक्षणासाठी ते अमरावतीला आले. तेथे त्यांनी बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतले. १९६७ रोजी त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक लढवली. विद्यार्थी जीवनातच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९७० मध्ये काँग्रेस पक्षाचा दबदबा होता. त्यांनी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस पक्षात सक्रिय प्रवेश केला. काँग्रेस पक्षात भैय्यासाहेब ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील काँग्रेसला बळकटी दिली. याची पावती म्हणून काँग्रेसने त्यांना १९७५ मध्ये अमरावती जिल्हा युवक काँग्रेसची जबाबदारी सोपवली. १९७८ ते १९८६ पर्यंत ते तिवसा विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर १९९४ साली भैय्यासाहेब ठाकूर यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेस पक्षा सोबत बंडखोरी केली होती. मात्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शदर तसरे यांनी ठाकूर यांचा पराभव केला. याच काळात १९९८ साली त्यांना खादी ग्रामउद्योग मंडळाचे राज्याचे उपाध्यक्ष पद मिळाले. त्यानंतर १९९९ साली त्यांना काँग्रेसने परत तिकीट दिली. मात्र ११०० मतांनी ठाकूर यांचा पराभव झाला. त्यांनी तिवसा तालुक्यात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन तयार केले. त्यासाठी त्यांनी श्री रावसाहेब ठाकूर विद्यानिकेतन मोझरी, श्री विद्यानिकेतन विद्यालय सातरगाव, प्रियंका इंग्लिश शाळा मोझरी, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय वस्तीगृह सुरू केले. 


मोझरीत शोककळा
भैय्यासाहेब ठाकूर यांचे मुळगाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले मोझरी आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या भैय्यासाहेबांच्या निधनामुळे माेझरी येथे शोककळा पसरली आहे. भैय्यासाहेब ठाकुर हे मुळचे काँग्रेस पक्षाचे असले तरी सर्व पक्षांत त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय नेते उपस्थित राहतील. 


सूर्यगंगा नदिवरील पुल आजही अजरामर
भैय्यासाहेब ठाकुर आमदार असताना त्यांचे पहिले काम हे मोझरीत झाले होते. पावसाळा आला की दुथडी भरून वाहणाऱ्या सूर्यगंगा नदिवरील पुलाचे उद््घाटन ३ मे १९८२ रोजी त्यांनी त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या पुलावरून आजही वाहतूक सुरू आहे. मोझरी विकास आराखड्यातून करोडो रुपयांची कामे झालील. आमदार यशोमती ठाकूर यांना मार्गदर्शन करून अनेक कामे त्यांच्या संकल्पनेतून मोझरी-गुरूदेव नगरात पुर्णत्वास गेली. 

बातम्या आणखी आहेत...