आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दराेडा टाकण्याच्या उद्देशाने अाले; मात्र बनावट चलन देऊन लुबाडण्याचा हाेता प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- खऱ्या नाेटांच्या मोबदल्यात बनावट नाेटा देऊन लुबाडणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश करण्यात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला शुक्रवारी यश अाले. ही टाेळी दराेड्याच्या उद्देशाने शहरात दाखल झाली हाेती. टोळीकडून पोलिसांनी जवळपास ३२ लाख २५ हजार रुपयांच्या बनावट नाेटा जप्त केल्या अाहेत. खऱ्या नाेटांच्या तुलनेने तीन पट बनावट नाेटा देणे, अशी शक्कल या टाेळीने लढवली हाेती. याप्रकरणी पोलिसांनी एकूण चार अाराेपींना अटक केली असून, एक महिला अाराेपी पलायन करण्यात यशस्वी झाली. पोलिसांकडून अटक अाराेपींची कसून चाैकशी करण्यात येत अाहे. 


विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाला बनावट नाेटा चलनात अाणणाऱ्या या टाेळीबाबत माहिती मिळाली. त्यांना मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा रचला. एका चारचाकी वाहनामधून पाच जण अाले. पोलिसांनी वाहन अडवून अातमध्ये बसलेल्या आसिफ खा शौकत खा (३५, रा. भारतीपुरा, ता. कारंजा जि. वाशीम), कमल अफसर शहा (२८, रा. वरूर, ता. दारव्हा, जि. यवतमाळ), मोहम्मद शाकीर अब्दुल वकील (३०, रा. कलगाव, ता. दिग्रस, जि. यवतमाळ), हुसेन बग्गू गारवे (२६, रा. मोतीनगर, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) यांची चाैकशी केली. चौकशीअंती त्यांना अटक केली. यापैकी िरना नामक महिला फरार झाली अाहे. ही महिलेचे अंदाजे वय २७ वर्षे असून, ती मानाेरा तालुक्यात रहिवाशी अाहे. ही महिला या टाेळीपासून लांब असल्याने ती पोलिसांच्या हाती लागली नाही. यातील एका अाराेपीवर नकली नोटांप्रकरणी यापूर्वीही गुन्हे दाखल अाहेत. 


गंभीर गुन्हे दाखल 
टोळीविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल हाेण्याची प्रक्रियाच सुरु हाेती. यात कलम ४८९ (अ,ब,क)(बनावट नाेटा बाळगणे, विक्री, नाेटा नकली असल्याचे माहित असल्यानंतरही त्या खऱ्या असल्याचे भासवणे) , ३९९ (दराेड्याच्या पूर्व तयारीने येणे), ४०२( दराेड्यासाठी शस्त्र व अावश्यक साहित्यासह राेडवर थांबणे) अादींचा समावेश अाहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नाेटा विकण्याचा गोरख धंदा करणारी टाेळी ग्राहकच शाेधत हाेती. एक लाख रुपयांच्या खऱ्या नाेटांच्या मोबदल्यात तीन ते चार लाख मिळत असल्याने अनेक जण या टाेळीच्या अामिषाला बळी पडले असावेत. पोलिसांनी या टाेळीतील अाराेपींची कसून चाैकशी सुरु असून, टाेळीने अशा पद्धतीने किती जणांना गंडवले काय ? िकती रुपयांनी लुटाले, या प्रश्नांची उत्तरे चौकशीअंती मिळणार अाहेत. 


असा अाहे लुटीचा फंडा 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या टाेळीची सूत्रधार एक महिला आहे. ३० लाख रुपयांच्या बनावट नाेटा १० लाख रुपयांमध्ये विकण्याचा गोरख धंदा ही टाेळी करीत हाेती. काेणाला संशय येऊ नये यासाठी नाेटांच्या प्रत्येक बंडच्या सर्वात वर आणि खाली दाेन-तीन खऱ्या नाेटा ठेवण्यात येत हाेत्या. उर्वरित मात्र नाेटा मात्र बनावट असायच्या. अर्थात या नाेटा मुलांच्या खेळण्या सारख्या असतात. टाेळीची म्हाेरक्या असलेली ही महिला नाेटा घेणाऱ्या संबंधित ग्राहकाशी बाेलणी करायची. टाेळी व ग्राहक हे ठरलेल्या ठिकाणी भेटत असत. टाेळी नाेटा व शस्त्रांसह तयारच असायची. प्रथम संबंधित ग्राहकांकडील खऱ्या नाेटा घेऊन पलायन करायचे, असेच िनयाेजन टाेळीचे असायचे. मात्र परिस्थिती-वातावरण अनुकूल नसल्यास टाेळी सावध पवित्रा घेत ठरल्याप्रमाणे नाेटांची देवाण-घेवाण करीत हाेती. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने कर्मचाऱ्यालाच १० लाख रुपयांच्या बनावट नाेटा घेण्यासाठी ग्राहकाला म्हणून पाठवले हाेते. अाधीच सज्ज असलेल्या पोलिसांनी व्यवहार सुरु असतानाच टाेळीला अटक केली. 


जप्त मुद्देमालाची किंमत ४१ लाख २२ हजार ६०० 
पोलिसांच्या विशेष पथकाने टोळीकडून एकूण ४१ लाख २२ हजार ६०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले अाहे. 
१. माेबाईल फाेन सहा : Rs. २५ हजार रुपये 
२. चार चाकी वाहन (एमएच-२९-एअार-२६६७) : Rs. ८ लाख 
३. मोटारसायकल (एमएच-३०-एवाय-२३३३) : Rs. ७० हजार 
४. नकली नाेटा : Rs. ३२ लाख २५ हजार 
५. खऱ्या नाेटा : Rs. १ हजार ७०० 
६. चाकू, दाेेरी, कात्री, लाेखंडी राॅड : Rs. ९०० 


बसस्थानकात सापळा 
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाला बनावट नाेटा चलनामध्ये अाणणाऱ्या या टाेळीबाबत माहिती मिळाली,त्यांनी बस स्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान एका वाहनामधून पाच जण अाले. नंतर पोलिसांनी त्यांना तेथेच पकडले. 

बातम्या आणखी आहेत...