आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षाच्या बालिकेचे केले मरणोत्तर नेत्रदान; पालकांनी समाजाला दिला नेत्रदानाचा संदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- हसती खेळती मुलगी आपल्यातून अचानक निघून गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून चार वर्षाच्या मुलीच्या पालकांनी तिचे मरणोत्तर नेत्रदान केले. तिच्या पालकांनी कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवला. 


पातूर तालुक्यातील अडगाव येथील रहिवासी महेश श्रीकृष्ण पाचपोर यांची चार वर्षांची देवयानी १६ जुलै रोजी मरण पावली. तिची आई शारदा व वडील महेश यांनी आपल्या मुलीने मरणोत्तर जग बघावे या उदात्त हेतून तिच्या नेत्रदानाचा निर्धार केला. मरणोत्तर नेत्रदानासाठी रोटरी नेत्रदान केंद्रास पाचारण करण्यात आले. 


नेत्रदान केंद्राचे प्रमुख डॉ.जुगल चिराणीया यांच्या मार्गदर्शनात मुलीचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. पालकांनी भावना आवरुन तिचे नेत्रगोलक प्रत्यारोपणासाठी रवाना केले. या वेळी उपस्थितांचे नेत्र पाणावले. नेत्रगोलक संकलन सहायक ऋषिकेश तायडे,शुभम येवले यांनी केले. तिच्या अकाली जाण्याने अडगावात शोक व्यक्त करण्यात आला. या वेळी तिची आजी गोकुळा पाचपोर समवेत कुटुंबीय उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...