आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला- सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेद्वारे पाणीदार होऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींना इंधनासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे बहुतेक ग्रामपंचायतींचा हुरुप वाढला असून श्रमदानासाठी अनेक हात पुढे आले आहेत.
जिल्ह्याच्या बार्शिटाकळी तालुक्यातील ७६, तेल्हारा तालुक्यातील ५५, पातूर तालुक्यातील ५३ व अकोट तालुक्यातील ४५ अशाप्रकारे २२९ गावांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. या सर्व गावांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची प्रशासकीय मदत मिळणार आहे. यासाठी ग्रामसेवक व तहसीलदार यांची सांगड घालून देण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून ही रक्कम संबंधितांपर्यंत पोहोचविली जात आहे.
डिझेलमुळे जमीनीचे खोदकाम रखडले. परिणामी सदर गाव स्पर्धेत टिकू शकले नाही, अशी गतवर्षीची ओरड होती. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्य शासनाचे अनुमोदन असून डिझेल व इतर किरकोळ कामांसाठी प्रत्येक गावाला जलसंधारणासाठीच्या निधीतून दीड लाख रुपयांची मदत करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार गेल्या ८ एप्रिल रोजी श्रमदानाचा आरंभ झाला. त्यानुसार आगामी २२ मे पर्यंत जिल्ह्याच्या २२९ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली जातील. यासाठी लागणाऱ्या यंत्रांना दीड लाखाचे डिझेल पुरवले जाईल.
जैन संघटनेतर्फे यंत्रांचा पुरवठा
प्रशासनाने इंधनाची सोय केली, तशीच यंत्र पुरवठ्याची सोय भारतीय जैन संघटनेने (बीजेएश) केली आहे. जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या या संघटनेने गतवर्षीही पोकलेन व जेसीबी पुरवले होते. यावर्षी त्यात आणखी काही यंत्रांची भऱ घालण्यात आली असून १५ अंकांची अटही शिथील केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.