आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार; तीन दिवसांनी तणाव निवळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर ठाम असलेल्या चायरे कुटुंबीयांची महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वना करून समजूत घातली. त्यानंतर पालकमंत्री मदन येरावार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून चायरे कुटुंबीयांच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही देऊन शासनाच्या वतीने शिष्टाई केली.  या शिष्टाईनंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास चायरे कुटुंबीय, नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनानंतर राजूरवाडी येथे शंकर चायरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   


शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री जिल्ह्यात असल्याने त्यांची भेट घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका चायरे कुटुंबीयांनी घेतली. मात्र, गुरुवारी मुख्यमंत्री शहरात आलेच नाहीत. शासनाच्या वतीने राज्यमंत्री संजय राठोड यांनी  चायरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. घडलेली घटना अत्यंत दु:खद असून शंकर चायरे यांच्या आत्महत्येप्रति शासन संवेदनशील आहे. चायरे यांच्या मुलींचे शिक्षण, एका सदस्यास नोकरी, कुटुंबीयास आर्थिक मदत या सर्व बाबींचा शासनस्तरावर सकारात्मक विचार करून कुटुंबीयांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे राठोड म्हणाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मदन येरावार यांच्याशी संवाद साधून चायरे कुटुंबीयांच्या भावना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवल्या. फडणवीस यांनीही चायरे कुटुंबीयांना साहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे राठोड यांना सांगितले. त्यानंतर चायरे कुटुंबीयांनी उपस्थित नातेवाईक व काही संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला. त्यानंतर यवतमाळ येथे शवविच्छेदन करून सायंकाळी ५ वाजता शंकर चायरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...