आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय जमिनीचा मालकी हक्क नागरिकांना द्या : भरगड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोला शहरात अनेक वर्षापासून शासकीय जागेत, महानगरपालिकेच्या जागेत, बी-टेन्युअर जागेत, गुंठेवारी जागेत राहत असतानाही जमीन नागरिकांच्या नावाने नसल्यामुळे घर मालकी हक्काचे झालेले नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींना नागरिकांना दररोज सामोरे जावे लागते. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी बांधलेले घर व सदरहू जमीन त्यांच्या नावाने,मालकी हक्काने करून देण्यासाठी माजी महापौर मदन भरगड यांनी २० जुन रोजी हजारो नागरिकांना घेेऊन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार खोत यांना जवळपास १५०० अर्ज सुपूर्द केले. 


आपले घर अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत कधीही पाडले जाण्याची भीती नागरिकांच्या मनात नेहमी असते. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडून घराचे नकाशे मंजूर होत नाहीत. शिवाय बँकेकडून कर्जही मंजूर होत नाही. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी बांधलेले घर व सदरहू जमीन त्यांच्या नावाने, मालकी हक्काने करून देण्यासाठी १७ २५ मे दरम्यान शहरातील विविध भागात क्रांतीरथाद्वारे जनजागृती अभियान राबवून माजी महापौर मदन भरगड यांनी १५० कॉर्नर सभांद्वारे सुमारे १ लाख अकोलेकरांशी संवाद साधुन जनतेला जमीन मालकी हक्काने करण्यासाठी जिल्हाधिकारी व अकोला महानगर पालिकेचे आयुक्त यांना द्यावयाचा अर्जाचा नमुनाही नागरिकांना दिला. तो अर्जाचा नमुना शहरातील असंख्य नागरिकांनी भरून मदन भरगड यांचे नेतृत्वात नायब तहसीलदार यांना सोपवला. नागरिकांनी दिलेल्या शासकीय जमीन मागणीच्या अर्जावर आपण योग्य कार्यवाही करून नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क द्यावा, अशी मागणी मदन भरगड यांनी तहसीलदार यांना या वेळी केली. 


या वेळी राजेंद्र चितलांगे, लक्ष्मण भिमकर, पराग कांबळे, गणेश कटारे, हरीश कटारिया, अभिषेक भरगड, राजेश पाटील, रमेश समुद्रे, देविदास सोनोने, घन:श्याम बमन, अशोक अस्वारे, कुंदन गुप्ता, सुनील साठे, रामचंद्र धनभर, आशा बारस्कर, रमेश पाचपोर, रमेश गोतमारे, रवींद्र समुद्रे, तुळशिराम सोळंके, शोभा मुंडे व शेकडो नागरिक उपस्थित होते. 


माजी महापौर मदन भरगड यांनी क्रांतीरथाद्वारे जनजागृती अभियान राबवून शहरातील १५०० नागरिकांची निवेदने तहसीलदारांना सोपवली. 

बातम्या आणखी आहेत...